काणकोणमध्ये समुद्र खवळला़

Subhash Mahale
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

काणकोणमध्ये समुद्र खवळला असून समुद्राच्या मोठ्या लाटा किनाऱ्यावर येऊन धडकू लागल्या आहेत. या मोठ्या लाटांमुळे दिवनबाग -आगोंद किनाऱ्यावरील काही पर्यटन अस्थापने लाटाच्या माऱ्यामुळे कोसळली आहेत.त्याचप्रमाणे लाटांमुळे किनाऱ्याची झीज सुरू झाली आहे.

काणकोण
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या चोवीस तासांत काणकोणात २.४५ इंच पावसाची नोंद झाली आहे.सोमवार पर्यत काणकोणात ११०.९८ इंच पावसाची नोंद झाली आहे. ९ जुलैला चापोली धरण जलाशयात ९८०.४२ हेक्टर मीटर पाण्याचा साठा तयार झाला होता आता त्यामध्ये वाढ होऊन ११२२ हेक्टर मीटर पाण्याचा साठा तयार झाला आहे.९ जुलैला काणकोणात ६५.६८ इंच पावसाची नोंद झाली गेल्या पंचवीस दिवसांत त्यामध्ये ४५.३० इंचानी वाढ झाली आहे.चापोली धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याचे जलस्त्रोत खात्याचे स्थानीक सहाय्यक अभियंता आझाद वेर्णेकर यांनी सांगितले.सोसायट्याच्या वाऱ्यासह पडत असलेल्या पावसामुळे काणकोणात वृक्षाची पडझड सुरू झाली आहे.

संपादन - यशवंत पाटील

 

संबंधित बातम्या