ब्रिटनमधून आलेल्या 602 प्रवाशांची गोव्यात शोधमोहिम

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे खळबळ उडाली आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील नागपूर नव्या स्ट्रेनचा रुग्ण सापडल्याचं म्हटलं जातंय. या पार्श्वभूमीवर गोव्यात 9 डिसेंबरपासून ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची शोधमोहिम सुरु आहे.

पणजी: ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे खळबळ उडाली आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील नागपूर नव्या स्ट्रेनचा रुग्ण सापडल्याचं म्हटलं जातंय. या पार्श्वभूमीवर गोव्यात 9 डिसेंबरपासून ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची शोधमोहिम सुरु आहे. जवळपास 602 प्रवासी गेल्या दोन आठवड्यामध्ये आले असून आरोग्य अधिकारी त्यांचा शोध घेत असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. ब्रिटन आणि दुबई या ठिकाणांहून सर्वाधिक लोकं दक्षिण गोव्यात असण्याची शक्यता आहे.

डिसेंबर महिन्यात युके आणि युएईमधून 602 जणांची यादी तयार केली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये यात कॅनसौलीममधील 91 जण, दक्षिण गोवा क्षेत्रातील 57 जण, उत्तर गोवा भागात 48, चिमबेलमधील 47  आणि उत्तर गोवा जिल्ह्यातील पणजीमधील काही जणांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं.

याशिवाय कॅंडोलिम भागात 41 जणांचा शोध घेतला जात आहे. यात कळंगुट, बागा आणि इतर पर्यटन स्थळांवरही बाहेरून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. तसंच राजधानी पणजी व आसपासच्या भागातील 28  जणांचाही यात समावेश आहे. ब्रिटन आणि युएईतून आलेल्यांचा उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील नावेली, आणि म्हापसा येथे या यंत्रणेकडून शोध घेण्यास सांगितले गेले आहे अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

गोव्यात बुधवारी कोरोना व्हायरसच्या 125  नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50, 364 इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत राज्यात 727 जणांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या