गोव्यातील 37 आरोग्य केंद्रांवर दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम; पणजीत 100 ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

देशाबरोबरच गोव्यातही काल 1 मार्चपासून 60 वर्षावरील व्यक्ती व 45 वर्षावरील आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती या सर्वांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु झाली. काल दिवसभरात 60 वर्षावरील 1031 व्यक्तींना व 45 वर्षावरील 189 व्यक्तींना असे एकूण 1220 व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लस टोचण्यात आली.

पणजी :  देशाबरोबरच गोव्यातही काल 1 मार्चपासून 60 वर्षावरील व्यक्ती व 45 वर्षावरील आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती या सर्वांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु झाली. काल दिवसभरात 60 वर्षावरील 1031 व्यक्तींना व 45 वर्षावरील 189 व्यक्तींना असे एकूण 1220 व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लस टोचण्यात आली. त्याचबरोबर २०० आरोग्य कर्मचाऱ्यांना गोव्यातील विविध ठिकाणच्या 37 सरकारी इस्पितळे आणि आरोग्य केंद्रामध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सोय करण्यात आलेली आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत नागरिकांना नाव नोंदणीसाठी संधी देण्यात येत असून त्यानंतर प्रथम नोंदणी केलेल्याला प्रथम या तत्त्वावर कोविड प्रतिबंधक लस टोचण्यात येत आहे. सरकारी इस्पितळांमध्ये व आरोग्य केंद्रामध्ये मोफत लस देण्यात येत असून खाजगी इस्पितळांमध्ये यासाठी 250 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

गोव्यातून दररोज एक टन भाजी बेळगावला; फलोत्पादन महामंडळाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

मात्र अद्याप गोवा सरकारने गोव्यातील खाजगी इस्पितळात लस देण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे काल पहिल्या दिवशी गोव्यातील सरकारी जिल्हा इस्पितळे, उपजिल्हा इस्पितळे, शहरी आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उप आरोग्य केंद्रे अशा 37 जागी कोविड प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू झाली. कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी काल पहिल्या दिवशी काही ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली तर काही केंद्रावर तुरळक प्रमाणात नागरिक येताना दिसत होते. पणजी येथील शहर आरोग्य केंद्रामध्ये कोविड प्रतिबंधक लस देण्यास काल सकाळी 10 वा. सुरवात झाली . येथे मोठ्या प्रमाणात नागरिक लसीकरणासाठी आले होते. प्रथम आलेल्यास प्रथम या तत्त्वावर कोविड प्रतिबंधक लस देण्यात येत होती. पणजी केंद्रात काल 100 व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लस टोचण्यात आली.

गोव्यात गेल्या 24 तासांत 54 नव्या कोरोना रूग्णांची नोंद; लसीकरण मोहिम वेगवान

एका दिवशी एका केंद्रात 100 जणांनाच लस देण्याचा नियम आहे. गोव्यातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी त्यातील ज्यांनी कोविड प्रतिबंधक लस अद्याप घेतलेली नाही त्यांनाही ती देण्यात येत आहे . त्याचबरोबर पोलीस, सुरक्षारक्षक व कोविड नियंत्रणाच्या मोहिमेत सहभागी झालेले सरकारी अधिकारी, कर्मचारी अर्थात कोविड फ्रंट लाईन वर्कर्स यांनाही कोविड प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. ज्यांना लसीचा डोस घेऊन 28 दिवस झालेले आहेत त्यांना लसीचा दुसरा डोस देण्यासही सुरूवात झाली आहे.

संबंधित बातम्या