‘साई’ इन्स्टिट्यूटची जागा कायदेशीरच, जळफळाटातूनच विरोधकांची टीका

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केलेला विकास विरोधकांना दिसत नाही
Sai Institute

Sai Institute

Dainik gomantak

डिचोली : साखळीतील साई नर्सिंग इन्स्टिट्यूटसाठी घेण्यात आलेला भूखंड गैरमार्गाने घेण्यात आला नाही, की इन्स्टिट्यूटमध्ये कोणताच गैरव्यवहार झालेला नाही, असे या इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर आणि सचिव संतोष मळीक यांनी पत्रकार परिषदेत (Press conference) स्पष्ट केले.

साखळी पालिकेच्या सत्ताधारी गटाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप करतानाच साई नर्सिंगसाठी गृहनिर्माण मंडळाचा भूखंड स्वस्तात लाटल्याचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत साई इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय मंडळाने साखळी पालिकेच्या सत्ताधारी गटाने केलेल्या आरोपांचे खंडन केले.

Sai Institute

बाबू आजगावकर हे कुठल्याही 'पक्षात' जाऊदेत आम्ही त्यांच्या सोबतच!

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री (CM) डॉ. प्रमोद सावंत यांचा विकास कामांचा धडाका पाहून विरोधक पुरते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळेच विरोधक इन्स्टिट्यूट आणि अन्य खोटे मुद्दे उपस्थित करून राजकारण करीत आहेत, अशी टीका केली. संचालक शिवानंद गावस, जिल्हा पंचायत (Panchayat) सदस्य गोपाळ सुर्लकर आणि भाजप (BJP) मंडळाचे सरचिटणीस गुरुप्रसाद नाईक हजर होते.

Sai Institute

नववर्षाच्या स्वागतासाठी किनारे गजबजले, नियम धाब्यावर

साई इन्स्टिट्यूटसाठी गृहनिर्माण वसाहतीतील जागा घेताना कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. सर्व सोपस्कार कायदेशीर केलेले आहेत, असे संतोष मळीक यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यावर टिका करणारे नगरसेवक (Corporator) राजेश सावळ यांनी अगोदर आपला पूर्वेतिहास जाणावा. मुख्यमंत्री (CM) डॉ. सावंत यांच्यामुळेच आपण नगरसेवक बनलोय. त्याची जाण ठेवावी. प्रवीण ब्लेगन यांनीही टिका कारण्यापूर्वी आपली पार्श्वभूमी तपासावी, असा सल्ला मळीक यांनी दिला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केलेला विकास विरोधकांना दिसत नाही. उलट तत्कालीन मुख्यमंत्री राणे यांच्या विकासाचे लेबल घेऊन विरोधक मिरवत आहेत, असे संतोष मळीक यांनी स्पष्ट केले. गोपाळ सुर्लकर यांनी टीका करताना विरोधक वैफल्यग्रस्त बनल्याचे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com