वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यात १४४ कलम लागू

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

दक्षिण गोव्यातील सिनेमा गृह, प्रदर्शने, धार्मिक कार्यक्रम, विमानतळ आदींवर निर्बंध लागू करण्यात आला आहे, असे दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.  

सासष्टी : कोरोना व्हायसरच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यात पुन्हा १४४ कलम लागू करण्यात आले असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वावर आधारित हे निर्बंध लागू करण्यात आले आहे. दक्षिण गोव्यातील सिनेमा गृह, प्रदर्शने, धार्मिक कार्यक्रम, विमानतळ आदींवर निर्बंध लागू करण्यात आला आहे, असे दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.  

कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात करण्यास सुरुवात केलेली असून यापासून सर्वांनी सुरक्षित राहावे, तसेच महामारीचा प्रसार रोखण्यासाठी गरोदर महिला, वृद्ध, मुलांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. 

 

अधिक वाचा :

गोवा शिपयार्डमध्ये बांधलेल्या वाराणसी फेरीला दाखवला हिरवा झेंडा

निवडणूक आयोगाच्या माध्यमातून गोव्यातील नवीन मतदारांना सुवर्णसंधी

विकासप्रकल्प बंद पाडले तर भावी काळ तुम्हाला क्षमा करणार नाही 

 

संबंधित बातम्या