Goa: सुरक्षा रक्षकांना मोठ्या पगारवाढीची संधी: मुख्‍यमंत्री

वाळपई (Valpoi, Goa) येथे सुरक्षा रक्षकांचा (Security Guard) दीक्षांत सोहळा, ८५ जण सेवेत दाखल
Goa Chief Minister Dr Pramod Sawant giving speech In Valpoi
Goa Chief Minister Dr Pramod Sawant giving speech In ValpoiDainik Gomantak

वाळपई : पंतप्रधान कौशल्य योजने अंतर्गत गोवा मानव संसाधन महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांना चांगल्या प्रकारची संधी आहे. यापुढे प्रत्‍येक कर्मचाऱ्याला दरवर्षी सरासरी पंचवीस हजार रुपयांपेक्षा जास्त पगारवाढीची संधी प्राप्त होणार आहे, अशी माहिती मुख्‍यमंत्री (Goa CM) डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिली.

वाळपई येथे शनिवारी वनप्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर ८५ सुरक्षारक्षकांचा दीक्षांत सोहळा मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत झाला. गोवा मानव संसाधन महामंडळातर्फे आयोजित या सोहळ्यात मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नारायण नावती, संचालक सर्वेश परब, वन प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे प्राचार्य अमर हेबळेकर, वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी शाम काणकोणकर यांची उपस्थिती होती.

Goa Chief Minister Dr Pramod Sawant giving speech In Valpoi
Goa: केळवाडेतील खचलेल्या पुलाची झाली दुरुस्ती

सर्वेश परब म्हणाले, की मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्थापन केलेल्या या महामंडळाला आज उज्‍ज्वल भवितव्य प्राप्त झाले आहे. राज्यातील मध्यमवर्गीय बेरोजगार तरुण-तरुणींना या महामंडळातर्फे समाधानकारक नोकरीची संधी प्राप्त झाल्याबद्दल समाधान वाटते.

कार्यकारी संचालक नारायण नावती यांनी महामंडळाच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. सूत्रसंचालन निखिल शेटकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com