'भात शेती साठी गुणवत्तापूर्ण आणि खात्रीपूर्वक रोपांची निवड महत्त्वाची'

'भात शेती साठी गुणवत्तापूर्ण आणि खात्रीपूर्वक रोपांची निवड महत्त्वाची'
RICE 1.jpg

राज्यात गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे (farmers) भात (Rice) लागवडीची लगबग सुरू झाली आहे. मात्र भरघोस उत्पादनासाठी गुणवत्तापूर्ण आणि खात्रीपूर्वक रोपांची निवड महत्वाची असल्याचे आयसीएआर (ICAR) च्या केंद्रीय किनारी कृषी शेती संशोधन संस्थेच्या (Central Coastal Agriculture Research Institute) वतीने स्पष्ट  करण्यात आले आहे.

गोव्याचा (Goa) भौगोलिक भूभागाचा विचार करता प्रामुख्याने तीन प्रकारच्या जमीन राज्यात आहे. राज्यात खजान जमीन, सकल आणि सपाट भागातील जमीन व डोंगराळ भागातील जमीन याचा समावेश होतो. या तीन भागांमध्ये भात शेतीचे उत्पादन, भौगोलिक परिस्थिती, पाण्याचे नियोजन याचा विचार करता वेगवेगळ्या प्रकारच्या भाताची लागवड होणे महत्त्वाचे आहे. यासाठी लागणारी रोपे (तरवे ) ही गुणवत्ता पूर्ण व खात्रीपूर्वक संस्थांकडून शेतकऱ्यांनी घ्यावीत किंवा शेतकऱ्यांनी खात्रीपूर्वक बियाणांचा वापर करून बुरशी, वायरस आणि फंगस कीड निर्माण होणार नाही यासाठी योग्य त्या प्रकारच्या औषध प्रक्रिया करून भात लागवड केल्यास भरघोस उत्पादनाची खात्री देता येईल.  (Selection of quality and reliable seedlings is important for paddy cultivation)

राज्यात खरिपाचे 26 ते 27 हजार हेक्टर  क्षेत्रामध्ये भात लागवड होते. यात सर्वाधिक 50 टक्के ज्योती, 30 टक्के जया, तर  7 ते 10 टक्के कर्जत 3 प्रकारचे भात उत्पादन घेतले जाते. याशिवाय कृषी संशोधन केंद्राने तयार केलेल्या गोवा धान 1,2,3,4 या भात जातींचा वापर केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल असे कृषी संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचा दावा आहे.

कोणत्या जाती कुठे लावावेत 

खेर सकल सपाट भागात जया, ज्योती ,कर्जत 3 या जातीचे भात लागवड करावी चांगल्या प्रकारे उत्पादन झाल्यास हेक्‍टरी 5 टन उत्पादन मिळते. खजान जमिनीत - गोवा धान1,2,3,4 या जातीच्या लागवड करावी त्यात प्रती हेक्टरी 3 ते 4 टन उत्पादन मिळते.तर डोंगराळ भागात -  सहभागी धान जातीचे उत्पादन मिळते. ते प्रति हेक्‍टरी 3 ते 4 टन उत्पादन मिळते.

उत्तम बियाणे निवडा 
उत्तम प्रकारच्या बियाणे, गुणवत्तापूर्ण रोपांमुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते याशिवाय संतुलित आणि योग्य खतांचा वापर केल्यास या उत्पादनात अधिक भर पडते यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा पोत, भौगोलिक स्थिती यांचा विचार करून योग्य प्रकारच्या बियाणे, खतांचा वापर केल्यास राज्यात भरघोस भात उत्पादन होईल.असे केंद्रीय किनारी शेती संशोधन  संस्थाचे संचालक
डॉ. प्रवीण कुमार म्हणाले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com