Goa Hubli Accident : गोव्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला अपघात; तीघांचा जागीच मृत्यु

हुबळी-गोवा महामार्गावर सीतावडा येथे घडला अपघात
accident
accidentDainik Gomantak

Goa Hubli Accident : गेले काही दिवस राज्यातील अपघातांचं सत्र सुरूच आहे. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जातेय.

राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखण्यात येतायत. पण अद्यापही अपघातांना आळा घालण्यात हवं तसं यश मिळालेलं नाही.

accident
Goa Illegal Hotels : गोव्यातील बेकायदा हॉटेल्सना झटका! आठवड्याला 40 तर एकूण 800 जणांना नोटीसा

दरम्यान, एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर येत आहे. सीतावडा येथे हुबळी-गोवा महामार्गावर गोव्यात जाणाऱ्या वाहनाने ठोकर दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यु झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी रामनगर पोलिसांनी वाहनात असलेल्या तामिळनाडू येथील दोघांना ताब्यात घेतलं आहे. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. याप्रकरणी रामनगर पोलीस पुढील तपास करीत आहे.

accident
Sawantwadi: धावत्या कंटेनरमधून मुला-मुलींचा आवाज आला; लोकांना वाटले मानवी तस्करी, पण...

तामिळनाडू येथून टी एन ६९ बीक्यू ८०६७ हे महिंद्रा बोलेरो वाहन घेऊन गोव्यात पर्यटनासाठी काही पर्यटक जात होते. यावेळी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हुबळी-गोवा महामार्गावर सीतावडा येथे ते आले असता त्यांच्या वाहनाने ठोकर दिली.

या अपघातात घार्ली येथील पार्वती गावाडा, दुर्गे कोळसेकर, तुळशी गावाडा यांचा जागीच मृत्यू झाला असून रामनगर येथील विपीन तळवे हा पिग्मी एजंट गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रामनगर आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.


या प्रकरणी रामनगर पोलिसांनी वाहनात असलेल्या तामिळनाडू येथील दोघांना ताब्यात घेतलं आहे. हे प्रकरण रामनगर पोलीस स्थानाकात नोंद झाले असून पोलिस पुढील तपास करीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com