‘स्वयंपूर्ण गोवा’ मोहीम आता शहरांत

 The self contained Goa campaign will be implemented in urban areas
The self contained Goa campaign will be implemented in urban areas

पणजी: स्वयंपूर्ण गोवा मोहीम आता ग्रामीण भागातील अंमलबजावणीनंतर शहरी भागात राबवण्यात येणार आहे. त्यासाठीच्या विविध खात्यांच्या पूर्वतयारीचा आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आढावा घेतला. पालिका मंडळांच्या निवडणुकीची अधिसूचना कधीही जारी होण्याची शक्यता असतानाच हा आढावा घेण्यात आला. यामुळे नव्या नगरसेवकांच्या खांद्यांवर स्वयंपूर्ण गोवा मोहिमेची धुरा असेल हे आज स्पष्ट झाले. 


सध्या सर्व पंचायत विभागांत स्वयंपूर्ण गोवा मोहीम सुरू आहे. त्यासाठी गाववार स्वयंपूर्ण मित्रांची नियुक्तीही सरकारने केली आहे. आजवर दोनवेळा मुख्यमंत्र्यांनी थेट सरपंच, पंचांशी संवाद साधला आहे. दर आठवड्याला मुख्यमंत्री या मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेत आहेत. जिल्हा पंचायत सदस्य निवडून आल्यावर त्यांच्याशी पहिला संवाद साधतानाही मुख्यमंत्र्यांनी मनुष्यबळ विकासावर भर द्यावा असे आवाहन केले. पंचायत, जिल्हा पंचायत यानंतर आता पालिका पातळीवर स्वयंपूर्ण गोवा मोहीम राबवण्यास राज्य सरकारचे प्रशासन सज्ज करण्याची तयारी मुख्यमंत्री करू लागले आहेत.


येत्या २ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण राज्य स्वयंपूर्ण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. त्यासाठी सरकार तयारी करत आहे. साध्या गरजा आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी इतर राज्यांवर गोव्याने अवलंबून राहू नये अशी स्थिती निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ११ पालिका क्षेत्रात पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. त्यासाठीचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो अशी स्थिती असताना सरकार ही तयारी करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com