ग्रामविकासाठी ‘स्वयंपूर्ण गोवा’ उपक्रम उपयोगी: दिलीप नाईक

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

ग्रामविकासासाठी ‘आत्मनिर्भर भारत’  व ‘स्वयंपूर्ण गोवा’ हे उपक्रम उपयोगी आहेत. या उपक्रमातून गावचा चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो. अनेकांची कामे सहजपणे होऊ शकतील, प्रत्येकाला आत्मनिर्भर होण्यासाठी या उपक्रमाद्वारे मदत मिळेले, चांगले मार्गदर्शन होईल., असे मत बेतकी-खांडोळा सरपंच दिलीप नाईक यांनी सांगितले.

खांडोळा:  ग्रामविकासासाठी ‘आत्मनिर्भर भारत’  व ‘स्वयंपूर्ण गोवा’ हे उपक्रम उपयोगी आहेत. या उपक्रमातून गावचा चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो. अनेकांची कामे सहजपणे होऊ शकतील, प्रत्येकाला आत्मनिर्भर होण्यासाठी या उपक्रमाद्वारे मदत मिळेले, चांगले मार्गदर्शन होईल., असे मत बेतकी-खांडोळा सरपंच दिलीप नाईक यांनी सांगितले.

आज मुख्यमंत्र्यांनी ‘स्वयंपूर्ण  गोवा’ संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी बेतकी-खांडोळा पंचायतीत पंच मुक्ता नाईक, पंच राजू नाईक, पंच अरविंद गावकर, सचिव गोकुळदास कुडाळकर उपस्थित होते.

‘स्वयंपूर्ण गोवा’ उपक्रमाद्वारे प्रत्येकाला आत्मनिर्भर होता येते. त्यासाठी गावोगावी नागरिकांना मार्गदर्शनासाठी स्वयंपूर्ण मित्र भेट देणार आहेत. प्रत्येकाने प्रयत्न केले तर निश्चितपणे आपल्या गरजा व उपलब्ध सुविधांनुसार जीवनमान सुधारता येते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी खूपच चांगली माहिती दिली. त्या माहितीचा चांगला उपयोग होणार आहे.  ग्रामपातळीवर गावचा, ग्रामस्थांचा विकास होण्यासाठी शासनातर्फे सहकार्य हवे. पंचायतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना राबविण्यासाठी अधिकाऱ्यांचे सहकार्य हवे. ग्राम पातळीवर शेतकऱ्यांच्या बाबतीत सहकाऱ्याची अपेक्षा आहे.

काही ठिकाणी शेतकरी शेती करतात, पिके घेतात. पण काही वेळेला त्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा जनावरांमुळे खूपच नुकसान होते. त्यावेळी त्यांना त्वरित मदत मिळायला हवी. काही वेळेला त्यांच्याकडे कृषी कार्ड नसते, जमीन नावावर नाही, म्हणून सवलत, सुविधा नाकारल्या जातात. रानटी जनावरांमुळे अनेकांच्या शेतीचे नुकसान झाले, परंतु अद्याप त्यांना न्याय मिळालेले नाही. त्यासंदर्भात सरकारने काही सवलत द्यायला हवी. अधिकाऱ्यांनी काही ठरावीक कागदपत्रांच्या आधारे सवलती, सुविधा त्यांना द्यायला हव्या, असेही सरपंच नाईक यांनी स्पष्ट केले.

आत्मनिर्भर भारत किंवा स्वयंपूर्ण गोवा हे उपक्रम तळागाळातील जनतेपर्यंत पोचविण्यासाठी येणाऱ्या अडचणी स्वयंपूर्ण मित्रांनी योग्य मार्गदर्शन केले. निर्माण होणाऱ्या त्रुटी दूर केल्या, तर निश्चितपणे या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचतील आणि सर्वांची विकास होईल. त्यातून आपला गोवा स्वयंपूर्ण होईल, असा ठाम विश्वास सरपंच दिलीप नाईक यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या