Goa: स्वयंपूर्ण पंचायतींचा होणार गौरव; पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित?
CM Pramod SawantDainik Gomantak

Goa: स्वयंपूर्ण पंचायतींचा होणार गौरव; पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित?

तसेच दहा पंचायतीच्या सरपंचांना आणि स्वयंपूर्ण मित्रांना येत्या सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी बोलण्याची संधी मिळणार आहे.

पणजी - सर्वाना सोबत घेऊन गोव्याचा (Goa) विकास करण्याचे ध्येय आपल्या सरकारने ठेवले असून राज्याच्या 151 विविध योजना ऑनलाईन उपलब्ध करणारे गोवा एकमेव राज्य आहे. राज्यातील ज्या स्वयंपूर्ण मित्रांनी व पंचायतींनी गेल्या वर्षभरात आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा योजनेअंतर्गत चांगले काम केले आहे. जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ दिला आहे त्यांचा 19 डिसेंबर रोजी गौरव केला जाणार आहे. तसेच दहा पंचायतीच्या सरपंचांना आणि स्वयंपूर्ण मित्रांना येत्या सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी बोलण्याची संधी मिळणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी आज दिली. (Self-sufficient panchayats will be glorified; Will PM Modi be present?)

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा योजनेचा आढावा घेताना विविध पंचायतीमध्ये नियुक्त केलेल्या स्वंयपूर्ण मित्रांच्या सोबत चर्चा केली. यावेळी पंचायतमंत्री मावीन गुदीन्होसह पंचायत सचिव सहभागी झाले होते. व्हिडियो कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलताना स्वयंपुर्ण मित्रांनी आपापल्या पंचायत क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती दिली. गावातील लोकांना विज जोडणी, पाणी जोडणी, संडास, दिव्यांगाना गरजेच्या वस्तू, गरिबांना दोनवेळचे अन्न, महिलांना शिलाई यंत्रे, महिला मंडळाना स्वयंरोजगार, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देतानाच अनेकांना विविध प्रकारचे स्वयंरोगार करण्यास प्रवृत्त केल्याचे यावेळी स्वयंपूर्ण मित्रांनी सांगितले.

CM Pramod Sawant
Goa Police: शिवोलीत साडेचार लाखाच्या गांजासह आरोपी गजाआड

गावातील लोकांना त्यांना गरजेच्या असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी स्वयंपूर्ण मित्रांनी सुरु केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्र्यानी त्यांंचे अभिनंदन केले. एका खास यंत्रनेद्वारे उत्कृष्ट पंचायत व स्वयंपूर्ण मित्र योजनेचा आढावा घेऊन त्यांना पुरस्कार दिले जाणार असल्याचे सांगून केंद्र सरकारची वेगळी यंत्रणा स्वयंपूर्ण पंचायतीची पाहणी करुन केंद्राला अहवाल देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. काल गोवा सरकारने आॅनलाईन पोर्टलचे उदघाटन केल आहे. त्याचा लाभ लोकांना होणार असून सर्व प्रकारच्या योजना घरात बसून समजून घेऊन त्यांचा लाभ घेण्याची संधी या पोर्टलद्वारे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

गोवा सरकारच्या पंचायत खात्याने गावातील घरांना क्रमांक देण्याचे जे विधेयक संमत केले आहे त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा यासाठी स्वयंपूर्ण मित्रासोबत पंच सरपंचानी प्रयत्न करावेत. असे मावीन गुदीन्हो यांनी यावेळी आवाहन केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com