ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते अनिल चोडणकर यांचा सत्कार

वास्को (vasco) येथील समाज कार्यकर्ते तथा मुरगांव तालुका ज्येष्ठ नागरिक मंच या संस्थेचे अध्यक्ष अनिल चोडणकर यांचा नुकताच गोवा सरकारच्या समाज कल्याण खात्यातर्फे " उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते अनिल  चोडणकर यांचा सत्कार
प्रमुख पाहुणे मंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते वास्को येथील समाज कार्यकर्ते तथा मुरगांव तालुका ज्येष्ठ नागरिक मंच या संस्थेचे अध्यक्ष अनिल चोडणकर सत्कार स्वीकारताना.बाजूस समाज कल्याण खात्याच्या प्रभारी संचालक दिपाली नाईक व उप संचालक सांतान फेर्नान्डिस व इतर मान्यवर.Dainik Gomantak

दाबोळी: वास्को (vasco) येथील समाज कार्यकर्ते तथा मुरगांव तालुका ज्येष्ठ नागरिक मंच या संस्थेचे अध्यक्ष अनिल चोडणकर यांचा नुकताच गोवा सरकारच्या समाज कल्याण खात्यातर्फे " उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे मंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते वास्को येथील समाज कार्यकर्ते तथा मुरगांव तालुका ज्येष्ठ नागरिक मंच या संस्थेचे अध्यक्ष अनिल चोडणकर सत्कार स्वीकारताना.बाजूस समाज कल्याण खात्याच्या प्रभारी संचालक दिपाली नाईक व उप संचालक सांतान फेर्नान्डिस व इतर मान्यवर.
मोरजी किनारी वन्य विभागातर्फे स्वच्छता मोहीम

पणजी येथील इन्स्टिट्युट मिनेझिझ ब्रागांझा सभागृहात समाज कल्याण खात्यातर्फे जागतिक जूयेष्ठ नागरिक दिन निमित्त समारंभ आयोजित करण्यात आला होता.या समारंभास गोव्याचे समाज कल्याण मंत्री मिलिंद सगुण नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समाज कल्याण खात्याच्या प्रभारी संचालक दिपाली नाईक व उप संचालक सांतान फेर्नान्डिस हे सुद्धा व्यासपीठावर आसनास्थ होते. यावेळी समाज कल्याण खात्यातर्फे देण्यात येत असलेल्या उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक पुरस्कारासाठी गोव्यातील विविध भागातील निवडलेल्या १६ ज्येष्ठ नागरिकांचा प्रमुख पाहुणे मिलिंद नाईक यांच्या हस्ते त्यांना श्रीफळ, शाल ,भेटवस्तु व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारमुर्तीमध्ये मुरगांव तालुक्यातील समाज कार्यकर्ते तथा मुरगांव तालुका ज्येष्ठ नागरिक मंचचे अध्यक्ष अनिल र. चोडणकर यांचा समावेश होता.

प्रमुख पाहुणे मंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते वास्को येथील समाज कार्यकर्ते तथा मुरगांव तालुका ज्येष्ठ नागरिक मंच या संस्थेचे अध्यक्ष अनिल चोडणकर सत्कार स्वीकारताना.बाजूस समाज कल्याण खात्याच्या प्रभारी संचालक दिपाली नाईक व उप संचालक सांतान फेर्नान्डिस व इतर मान्यवर.
मुख्यमंत्री सावंत यांचा तृणमुलला टोला

अनिल चोडणकर हे निवृत्त मुख्याध्यापक असून मुरगांव तालुक्यातील एक परिचित समाज कार्यकर्ते आहेत .समाज कार्याबरोबर सध्या ते ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारे मदत करण्यासाठी पुढे सरसावतात .अखिल गोवा ज्येष्ठ नागरिक महासंघाशी सलग्न असलेल्या मुरगांव तालुका ज्येष्ठ नागरिक मंचचे अध्यक्ष आहेत .ज्येष्ठ नागरिक व पालकांना त्यांच्या मुलांकडून होणारा क्षळ यापासुन मुक्ती तसेच उदार निर्वाहासाठी त्यांच्याकडून मानधन मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व पालक देखभाल आणि कल्याण कायदा २००७ यान्वयेयेथील उप जिल्हाधिकारी कार्यालयात दावे सादर करण्यास मदत करतात .ज्येष्ठ नागरिक व पालक आणि त्यांच्या मुलांमधील तंटे समंजस व समोपचाराने मिटविण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी यांनी या कायद्यान्वये मुरगांव तालुक्यासाठी " समोपदेशक आधिकारी " म्हणून नियुक्ती केलेली आहे. मुरगांव तालुका ज्येष्ठ नागरिक मंचवतीने ते ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करतात. त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन यापुर्वी अनेक संस्थानी त्यांचे सत्कार केलेले आहेत.हल्लीच त्यांचा पब्लिक रिलेशन कौन्सिल आॕफ इंडिया या संस्थेतर्फेही ज्येष्ठ पत्रकारासाठीचा " चाणाक्य पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या ह्या सत्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Stories

No stories found.