मिराबाग-माडेल परिसराची ज्येष्ठ नागरिकांनी केली स्वच्छता

dainik Gomantak
रविवार, 5 जुलै 2020

माडेल - मिराबाग येथील सौंदर्यीकरण केलेल्या परिसरात मिराबाग येथील ज्येष्ठ नागरिकांनी स्वच्छता अभियान राबवून प्लास्टिक बाटल्या, दारूच्या रिकामी बाटल्या, फोडलेल्या काचा एकत्र करून आजच्या युवा पिढीला स्वच्छतेचा मंत्र दिला. या अभियानात पंचवीसहून अधिक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

कुडचडे
माडेल - मिराबाग येथे विरंगुळा म्हणून निर्माण केलेल्या परिसरात आनंद लुटण्यासाठी येणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक बाटल्या, दारूच्या बाटल्या अत्यावस्त फेकण्याचा प्रकार घडत आहे. चांगल्या परिसराचा तरुणाईकडून गैरवापर केला जात आहे. याचे दुःख ज्येष्ठ नागरिकांना वाटत आहे. त्याच भावनेतून मिराबाग भागातील पंचवीसपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन या परिसरात स्वच्छता अभियान राबविल्याबद्दल त्यांचे पंचायत सदस्य संजय नाईक यांनी अभिनंदन आहे. तसेच या परिसरात कचरा करणाऱ्यांविरुद्ध पोलिस कारवाई करण्यासाठी शिफारस करण्यात येणार असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ नागरिक दिलकुश कवळेकर म्हणाले, की मिराबाग स्वच्छ ठेवण्यासाठी आजपर्यंत ज्येष्ठ नागरिकांनी प्रयत्न केला आहे. यापुढे तरुण पिढीने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घाव्या. यावेळी पंच संजय नाईक यांनी ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या भेट म्हणून दिल्या.

संबंधित बातम्या