गोव्यातील ज्येष्ठ नागरिकांना पोस्‍टमनद्वारे घरपोच मिळणार हयात प्रमाणपत्र ; रांगेत ताटकळत राहण्‍याची कटकट वाचणार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

पणजी, ता. ३० ( प्रतिनिधी) : कोरोना महामारीचे संकट अद्यापही असताना ज्येष्ठ नागरिकांना अधिक काळजी घेण्यासाठीचे आवाहन वारंवार केले जात आहे. ज्येष्ठांनी घराबाहेर न पडता, रांगेत उभे न राहता त्यांच्यापर्यंत डिजीटल हयात प्रमाणपत्र पोहोचविण्याचे सत्कार्य पोस्ट खात्याने केले आहे. दक्षिण आणि उत्तर गोव्यातील 

 

पणजी : कोरोना महामारीचे संकट अद्यापही असताना ज्येष्ठ नागरिकांना अधिक काळजी घेण्यासाठीचे आवाहन वारंवार केले जात आहे. ज्येष्ठांनी घराबाहेर न पडता, रांगेत उभे न राहता त्यांच्यापर्यंत डिजीटल हयात प्रमाणपत्र पोहोचविण्याचे सत्कार्य पोस्ट खात्याने केले आहे. दक्षिण आणि उत्तर गोव्यातील मिळून १ हजार २८४ हयात असल्‍याबाबतची प्रमाणपत्रे ज्येष्ठांपर्यंत पोहोचविली आहेत. ही प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी ज्येष्ठांच्या घरापर्यंत जाऊन माहिती घेण्याचे कार्य राज्यातील पोस्टमननी केले आहे. 

ज्येष्ठ नागरिकांना अनेक कामांसाठी हयात प्रमाणपत्राची आवश्यकता असते. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रांगेत उभे राहणे, अर्ज करणे यासारखा त्यांचा त्रास कमी व्हावा. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर या कामासाठी पडल्यानंतर त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, या सुहेतूने पोस्टाने ही योजना सुरू केली असल्याची माहिती सिनिअर सुप्रिटेंडन्ट डॉ. सुधीर जाखेरे यांनी दिली. 
 

सुविधेसाठी काय करावे?

या प्रक्रियेचा लाभ घेणेसुद्धा अतिशय सोपे आहे. ज्यांना हयात 
प्रमाणपत्राची आवश्यकता आहे, त्यांनी ८५९५५९८१८८ या क्रमांकावर मेसेज पाठविल्यास त्यांच्यापर्यंत एक लिंक येईल. या लिंकच्या माध्यमातून त्यांना स्वतःचे नाव नोंदणी करावे लागेल. त्यानंतर त्यांच्या फोनवर सरळ पोस्टमनचा फोन येईल. पोस्टमन स्वतः त्यांच्या घरी जाऊन बाकीची प्रक्रिया पूर्ण करेल आणि मग लवकरात लवकर त्यांच्या हाती हयात असण्याचा त्यांच्या मोबाईलवर दाखल होईल. या सगळ्या प्रक्रियेसाठी पोस्टाकडून केवळ ७० रुपयांचा शुल्क आकारला जात आहे. या 
सुविधेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे कष्ट कमी झाले असून त्यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रियासुद्धा चांगल्या असल्याची माहिती पोस्टातून मिळाली. 

 

अधिक वाचा :

दिगंबर कामत यांनी जीवरक्षकांना दिले आश्वासन 

गोवा काँग्रेस अध्यक्षांचे भाजपसमर्थक नगराध्यक्षांना आवाहन

देशातील दुसरे ‘फिलाटेलिक’ संग्रहालय राजधानी दिल्लीनंतर गोव्यात साकारणार 

संबंधित बातम्या