Health Care: होमिओपॅथी, आयुष सेवांसाठी वेगळे संचालनालय

मंत्री सुभाष शिरोडकर : तांबडी माती, मोतीडोंगर येथील क्षयरोग इस्पितळे बंद करणार
Ayush Ministry
Ayush Ministry Dainik Gomantak

सासष्टी: गोव्यातील आरोग्य संचालनालय सर्व क्षेत्रातील वैद्यकीय सुविधा हाताळते. त्यामुळे या संचालनालयावरील ताण वाढत आहे. गोव्यात होमिओपॅथी व आयुर्वेदिक डॉक्टरांची संख्या तसेच वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्र्वभूमीवर सरकार होमिओपॅथी व आयुष वैद्यकीय सेवांसाठी वेगळे संचालनालय सुरू करणार असल्याचे जलस्रोत मंत्री तसेच शिरोडा येथील कामाक्षी होमिओपॅथी महाविद्यालय व इस्पितळाचे संस्थापक संचालक सुभाष शिरोडकर यांनी आज मडगावात सांगितले.

(Separate Directorate for Homeopathy, AYUSH Services)

Ayush Ministry
स्वातंत्र्यसैनिकांप्रती असंवेदनशीलतेने भाजप सरकारचा उद्धटपणा उघड; युरी आलेमाव

उदघाटन सोहळ्यात गोवा बोर्ड ऑफ होमिओपॅथी मंडळाचे अध्यक्ष डॉ. बिपीन साळकर, रजिस्ट्रार डॉ. राजेंद्र काणेकर उपस्थित होते. उदघाटनानंतर डॉ. गोविंद देसाई यांचे क्षयरोगाचे निर्मूलन व डॉ. लिंगराज मगदुम यांनी होमिओपॅथीच्या दृष्टीने क्षयरोग या विषयांवर मार्गदर्शन झाले.

या परिसंवादाला अनेक होमिओपॅथी व आयुष डॉक्टरांची उपस्थिती लाभली. डॉ. राजेंद्र काणेकर यांनी स्वागत केले. डॉ. प्रतिष्ठा कुंकळयेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मेरिलीन टेलीस यांनी आभार मानले.

Ayush Ministry
Goa News: मोकाट फिरणाऱ्या गुरांना वाली कोण?

गोवा राज्य क्षयरोगमुक्त

गोवा बोर्ड ऑफ होमिओपॅथीतर्फे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (आरोग्य संचालनालय) यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या क्षयरोग निर्मूलन परिसंवादाचे उदघाटन केल्यावर ते बोलत होते. गोव्यात क्षयरोगाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. क्षयरोगी नाहीच, असे म्हटले तरी चालेल. त्यामुळे पणजीतील तांबडी माती आणि मडगावातील मोती डोंगर येथील क्षयरोग इस्पितळे बंद करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

केवळ चांगले रस्ते, नियमित पाणी व वीजपुरवठा म्हणजे विकास नव्हे. चांगल्या वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणे, हासुद्धा विकासाचाच भाग आहे. राज्य सरकार वैद्यकीय तसेच शैक्षणिक क्षेत्राला प्राधान्य देत आहे.

- सुभाष शिरोडकर, जलस्रोत मंत्री.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com