
Odisha FC : एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसीचे माजी सफल प्रशिक्षक स्पॅनिश सर्जिओ लोबेरा यांची ओडिशा एफसीने आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेसह फुटबॉल मोसमासाठी मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. त्यांचा करार दोन वर्षांसाठी आहे.
ओडिशाने यंदा सुपर कप जिंकला, तसेच एएफसी कप गट साखळीसाठी पात्रता मिळविली आहे. लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटीने २०२०-२१ मोसमात आयएसएल करंडक, तसेच लीग विनर्स शिल्डचा मान मिळविला होता.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने २०१९ मध्ये सुपर कप पटकावला होता, तसेच २०१९-२० मोसमात लीग शिल्डसह एएफसी चँपियन्स लीगसाठी पात्रता मिळविली होती. त्यांना एफसी गोवाने २०१७ साली करारबद्ध केले होते. या संघाचे ते एकंदरीत तीन मोसम प्रशिक्षक होते.
ओडिशा एफसीने २०२२-२३ मोसमात जोसेप गोम्बाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसएल स्पर्धेत सहावा क्रमांक मिळवत प्ले-ऑफ फेरी गाठली होती, मात्र नॉकआऊट लढतीत त्यांना एटीके मोहन बागानकडून हार पत्करावी लागली. त्यानंतर स्पेनच्या गोम्बाऊ यांनी पद सोडले.
नंतर ओडिशाने गोमंतकीय क्लिफर्ड मिरांडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुपर कप जिंकून मोसमाचा विजयी समारोप केला. शिवाय एएफसी कप स्पर्धेसाठीही पात्रता मिळविली. लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली ओडिशा संघ मोठी उंची गाठण्याची अपेक्षा बाळगून आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.