
मडगाव: कर्मचारी निवड आयोगामार्फत नोकर भरती हे काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातील एका आश्वासनाची अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वागतार्ह पाऊल आहे. परंतु त्यासाठी जानेवारीपर्यंत का थांबायचे? आताच अधिसूचना जारी करा. डॉ. प्रमोद सावंत खरे बोलले. भाजपच्या मंत्री आणि आमदारांनी कधीही नोकऱ्या दिल्या नाहीत, त्यांनी नोकऱ्या विकल्या, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला.
(Serious allegations of Yuri Alemao that BJP did not give jobs, but literally sold them in goa)
मेगा जॉब फेअरमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना, युरी आलेमाव यांनी भरती घोटाळ्यांवरून भाजप सरकारवर निशाणा साधला व नगरपालिका नगराध्यक्ष निवडणुकीत सत्ता बळकावण्यासाठी अध्यादेश आणण्यात भाजप सरकारने जी तत्परता दाखवली, तीच तत्परता आता कर्मचारी निवड आयोगातर्फे भरती करण्यात दाखवली पाहिजे, असा टीका केली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत खरे बोलले आहेत. त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. भाजपच्या मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांनी कधीही लायक तरुणांना नोकऱ्या दिल्या नाहीत, त्यांनी केवळ नोकऱ्या विकल्या.
नोकरी विक्रीसाठी नियमांत बदल
नोकर भरती घोटाळ्याला मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद होते हे उघड आहे. कर्मचारी निवड आयोगाला डावलून परस्पर खातेनिहाय भरतीद्वारे नोकऱ्यांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी 2021 मध्ये कर्मचारी निवड आयोगाच्या नियमांमध्ये सुधारणा केली होती, असा आरोप युरी यांनी केला.
..तर गोवा प्रगतीशील राज्य
उशिराने का होईना, ही चांगली सुरुवात आहे. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विनंती करतो की, त्यांनी काँग्रेसने तयार केलेल्या ‘गोवा व्हिजन २०३६ रोडमॅप’मधील प्रत्येक शब्द वाचून त्याची अंमलबजावणी सुरू करावी. हा रोडमॅप प्रख्यात तज्ज्ञांनी तयार केलेल्या गोवा व्हिजन २०३५ दस्तऐवजावर आधारित आहे. यामुळे बेरोजगारीचे सर्व प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि गोव्याचे प्रगतीशील राज्यात रूपांतर होईल, असे युरी म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.