शिरोडा मतदारसंघात १४ पासून ‘सेवादिन’

प्रतिनिधी
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

आमदार सुभाष शिरोडकर : लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन

शिरोडा: शिरोडा मतदारसंघात सेवादिवस सोमवार १४ ते शुक्रवार २५ च्या दरम्यान विविध लोकोपयोगी कार्यक्रमाद्वारे साजरा करून सर्वसामान्‍य लोकांच्या विकासाचे कार्यक्रम आखून त्यामध्ये सर्व नागरिकांना सहभागी करून घ्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस हा सेवादिन म्हणून जनतेच्या सेवेसाठी समर्पित करावा आणि २५ रोजी भाजपचे दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन आणि २ ऑक्टोबर रोजी गांधीजयंती उत्सवही विविध कार्यक्रमानिशी  साजरा केला जाईल, अशी माहिती आमदार सुभाष शिरोडकर यांनी केले.

शिरोडा येथे ८ रोजी शिरोडा भाजप मंडळ आयोजित बुथ सदस्य आणि मंडळ समितीच्या सभेत शिरोडकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भाजप मंडळ अध्यक्ष सूरज नाईक, सचिव अवधूत नाईक, परिमल सामंत, जिल्हापंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर, डॉ. गौरी शिरोडकर आदी होते.

शिरोडा भाजप मंडळचे अध्यक्ष सूरज नाईक यांनी सेवादिन साजरा करण्यासंबंधीचे विचार व्यक्त केले. डॉ. गौरी शिरोडकर यांनी प्रोजेक्टद्वारे कार्यक्रमांची आखणी सांगितली. सुमारे १२ दिवस चालणाऱ्या सेवदिन कार्यक्रमात मोहीम राबवली जाणार आहे. गावातील गरजूंना चष्म्यांचे वाटप अपंग मुलांना व्हीलचेअरचे वितरण, आरोग्य शिबिर अशा विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. मंडळ अध्यक्ष सूरज नाईक यांनी स्वागत केले. सचिव अवधूत नाईक यांनी सूत्रसंचालन केले तर दीपक नाईक बोरकर यांनी आभार मानले.
 

संबंधित बातम्या