अपहरणप्रकरणी जेनेटो कार्दोजचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला  

प्रतिनिधी
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

पणजीतील अपहरण प्रकरणातील संशयित जेनेटो कार्दोज याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज पणजी न्यायालयाने आज फेटाळला तर सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला संशयित जेनेटो कार्दोज याला सात दिवसांची पोलिस कोठडी दिल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

पणजी: पणजीतील अपहरण प्रकरणातील संशयित जेनेटो कार्दोज याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज पणजी न्यायालयाने आज फेटाळला तर सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला संशयित जेनेटो कार्दोज याला सात दिवसांची पोलिस कोठडी दिल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्याच्या या प्रकरणातील जामीन अर्जावरील निर्णय होऊन त्यावरील निर्णय २८ ला ठेवण्यात आला आहे. 

संशयित जेनेटो कार्दोज हा पणजीतील अपहरण प्रकरणात आहे. जुने गोवे पोलिस स्थानकात त्याच्याविरुद्ध इम्रान बेपारी याच्यावरील खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणी चौकशी पूर्ण झाल्याने न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्यामुळे पणजी पोलिस स्थानकात नोंद असलेल्या अपहरण प्रकरणात चौकशीसाठी अटक करण्यात येणार आहे. त्यासाठीची परवानगी न्यायालयाकडून घेतली जाईल, अशी माहिती पणजी पोलिसांनी दिली. 

जुने गोवे पोलिस स्थानकात नोंद असलेल्या गुन्ह्याप्रकरणी संशयित जेनेटो कार्दोज याची जबानी नोंद केली असली तरी त्यातून काही ठोस अशी माहिती मिळालेली नाही. या हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी शोध घेतला असला तरी ठोस पुरावेही हाती लागलेले नाहीत. त्याच्या साथीदारांच्या जबान्यांच्या आधारे हल्ल्यावेळी वापरलेली हत्यारे व पिस्तुल तसेच रिव्हॉल्वर कोठून आणली होती याची माहिती पोलिस जमा करत आहेत. 

सांताक्रुझ येथील टोळीयुद्ध घटनेनंतर संशयित जेनेटो कार्दोज पसार झाला होता. पोलिसांच्या हाती तो लागत नव्हता मात्र त्याच काळात
त्याने एका तरुणाचे मालमत्तेप्रकरणी अपहरण करून धमकावले होते. त्यामुळे पोलिसांना तो सापडत नसल्याने नाचक्की झाली होती. पोलिसांनी त्यानंतर शेजारील राज्याच्या पोलिसांची मदत तसेच संशयिताच्या कुटुंबियांना वारंवार प्रश्‍न विचारून हैराण केले होते. त्याला मदत करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे संशयिताला पोलिसांसमोर शरण येण्याची वेळ आली होती.
 

संबंधित बातम्या