Goa Crime: राॅड्रिग्स यांच्या शिक्षेला सत्र न्यायालयाकडून स्थगिती

5 जानेवारी 2023 रोजी म्हापसा जेएमएफसीने अ‍ॅड. रॉड्रिग्स यांना या कथित सेक्स स्कँडल प्रकरणात दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती.
Court |Goa Crime
Court |Goa CrimeDainik Gomantak

Goa News: माजी जलसंपदामंत्र्यांशी संबंधित कथित सेक्स स्कँडलप्रकरणी एका महिलेची सोशल मीडियावर बदनामी केल्याबद्दल म्हापसा न्यायालयाने अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्स यांना ठोठावलेल्या शिक्षेच्या निर्णयाला उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

5 जानेवारी 2023 रोजी म्हापसा जेएमएफसीने अ‍ॅड. रॉड्रिग्स यांना या कथित सेक्स स्कँडल प्रकरणात दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती.

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 374 (3) अन्वये दाखल केलेल्या अ‍ॅड. रॉड्रिग्स यांच्या आव्हानावर सुनावणी घेताना हा आदेश सत्र न्यायालयाने दिला. रॉड्रिग्स यांच्यातर्फे अ‍ॅड. अरुण ब्रास डिसा यांनी बाजू मांडली.

या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोर्टाने रॉड्रिग्स यांचा जामीन मंजूर केला आहे. म्हापसा जेएमएफसीच्या आदेशाला 49 कारणांवरून अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 22 फेब्रुवारीला होणार आहे.

Court |Goa Crime
Goa Police: बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी पोलिस बडतर्फ

काय आहे प्रकरण?

  • 27 नोव्हेंबर 2017 रोजी हणजूण पोलिस स्थानकात अ‍ॅड. रॉड्रिग्स यांच्याविरुद्ध महिलेच्या बदनामीप्रकरणी गुन्हा नोंद केला होता.

  • गुन्हा नोंद झाल्यानंतर हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपविले होते.

  • तीन वर्षांच्या तपासानंतर क्राईम ब्रँचने 27 नोव्हेंबर 2020 रोजी 210 पानांचे आरोपपत्र म्हापसा न्यायालयात अ‍ॅड. रॉड्रिग्स यांच्याविरोधात दाखल केले होते.

  • 5 जानेवारी 2021 रोजी या प्रकरणाचा खटला सुरू झाला.

  • दोन वर्षांत तब्बल 40 सुनावण्यांनंतर याचा निकाल म्हापसा जेएमएफसी कोर्टाने दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com