Margao Casino Raid: मडगावातील अवैध कसिनोवर छापेमारी; अनेकांची धरपकड

स्थानिकांच्या तक्रारीवरुन केली कारवाई
Margao Casino Raid
Margao Casino RaidDainik Gomantak

मडगाव: मडगाव येथे अवैधरित्या कसिनो सुरु असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मडगाव पोलीसांनी आज रात्री पॉवर हाऊस परिसरात छापा टाकला आहे. व त्या ठिकाणी सुरु असलेल्या बेकायदेशीर मिनी कसिनोवर कारवाई केली. या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली आहे.

(Seven people arrested in raid on illegal casino in Margao)

Margao Casino Raid
Goa Crime News: अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणास स्‍थानिकांकडून चोप

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना मडगाव येथील पॉवर हाऊस परिसरात मिनी कसिनो सुरु असल्याची माहिती मिळाली होती. यावरुन पोलिसांनी आज छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच कसिनोमध्ये असलेली काही रक्कम, लॅपटॉप जप्त केले आहेत.

Margao Casino Raid
Casinos in Mandovi: मांडवीतील कॅसिनो आणि थकीत वीज बिलाबाबत गोवा मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

ही कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कारवाईबाबत पोलिसांकडून अधिक माहिती मिळू शकली नाही. तसेच ही कारवाई मडगावचे पोलीस निरिक्षक तुळशीदास नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. कसिनोविरोधात स्थानिकांनी बऱ्याच तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी आज कारवाई केली असल्याचे एका स्थानिकाने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com