राज्यात चोवीस तासांत कोरोनाचे सात बळी

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

आज आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे कोरोना बळींची संख्या ५९२ वर पोचली आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात २२१ जणांना कोरोनाची नव्याने लागण झाली असून राज्यात एकूण दोन हजार चारशे दोन इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. 

पणजी : आज आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे कोरोना बळींची संख्या ५९२ वर पोचली आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात २२१ जणांना कोरोनाची नव्याने लागण झाली असून राज्यात एकूण दोन हजार चारशे दोन इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. 

आज ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यामध्ये, माशेल येथील ७० वर्षीय पुरुष, धारबांदोडा ७० वर्षीय पुरुष, मेरशी येथील ६५ वर्षीय महिला, मुंबई येथील ७२ वर्षीय पुरुष, वास्को येथील ५६ वर्षीय पुरुष आणि नावेली येथील ८७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यातील ३ मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयात, ३ मृत्यू इएसआय रुग्णालय, मडगाव आणि उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात एकाच मृत्यू झाला आहे. 

उत्तर गोव्यात खाटांची संख्या ४६९ इतकी असून सध्या ३७५ खाट वापरात आहेत तर दक्षिण गोव्यात ६९२ इतकी खाटांची संख्या असून सध्या ५९८ खाट वापरात आहेत. आजच्या दिवसभरात ११५ लोकांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला तर ११५ लोकांना इस्पितळात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आज दिवसभरात अठराशे एक इतके लाळेचे नमुने तपासण्यात आले. राज्याचा रिकव्हरी रेट ९३.०३ टक्के इतका आहे.आज ५४ लोकांना इस्पितळात भरती करण्यात आले. 

दरम्यान डिचोली आरोग्य केंद्रात ७५, म्हापसा आरोग्य केंद्रात ९१, पणजी आरोग्य केंद्रात १२१, चिंबल आरोग्य केंद्रात १३२, पर्वरी आरोग्य केंद्रात १४१, मडगाव आरोग्य केंद्रात २२८, कुडतरी आरोग्य केंद्रात ९०, फोंडा आरोग्य केंद्रात १५७, पर्वरी आरोग्य केंद्रात १४१ रुग्ण इतके कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या