किर्लोसकडे जाणाऱ्या सात गावांचा संपर्क तुटला ; जनजीवन विस्कळीत

The seven villages leading to Kirlos were cut off; Disrupted public life
The seven villages leading to Kirlos were cut off; Disrupted public life

 सिंधुदुर्ग - कोकणात पावसाचा जोर वाढला असून,  सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे नदी, नाल्यांची पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ  झाली आहे. The seven villages leading to Kirlos were cut off; Disrupted public life

कणकवलीतील गड नदीचा पात्र भरभरून वाहत आहे. किर्लोसवरून दुसरीकडे जाणाऱ्या बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. यामुळे बंधारावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून येथील  सात गावांचा संपर्क तुटला आहे.

या भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीलगत राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला  आहे. दरम्यान सिंधुदुर्गातील पावसाळी पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या आंबोलीचा मुख्य  धबधबा आता प्रवाहित झाला आहे.

त्याच्या  आजुबाजूचे  लहान मोठे धबधबे सुद्धा प्रवाहित झाले आहेत. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीमध्ये सध्या निसर्गरम्य वातावरण तयार झालं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊसाची नोंद आंबोलीमध्ये होते. गेल्या वर्षी  कोरोना महामारीमुळे आंबोलीत पर्यटनाकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. मात्र 1 जुलैपासून आंबोलीचं पावसाळी पर्यटन सुरु करण्याची मागणी येथीळ व्यवसाईकांनी केली आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com