मांद्रेतील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी अनेक योजना

वार्ताहर
रविवार, 6 सप्टेंबर 2020

पंचायत सदस्य व मांद्रे टास्क फोर्स समितीची तातडीची बैठक

तेरेखोल: मांद्रे पंचायत क्षेत्रांतील कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंचायत मंडळ व नागरिकांनी तातडीची बैठक बोलावून विविध योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला. 

पंचायत मंडळ व नागरिकांनी मांद्रे पंचायतीच्या दिनदयाळ सभागृहांत आज शुक्रवार दि.४ रोजी सायं.५.३० वा.बोलावलेल्या तातडीच्या बैठकींत पंचायत क्षेत्रांतील कोविडचा फ़ैलाव रोखण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी यावर चर्चा करण्यात आली.बठक सरपंच सौ.सेरेफिना फेर्नांडीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी उपसरपंच आंब्रोस फेर्नांडीस,पंच सदस्य महादेव हरमलकर,संतोष बर्डे,तुये आरोग्य केंद्राचे कर्मचारी गौरेश शेटगांवकर,ऍड.प्रसाद शहापूरकर,माजी पंच सदस्य महेश कोनाडकर,दुमिन्ग फेर्नांडीस,डॉ.जोसेफ फेर्नांडीस,शिक्षक संगम म्हामल,शंकर गोवेकर,तुषार गोवेकर,रावजी कोनाडकर आदी उपस्थित होते.मांद्रेत कोविड १९ रुग्णांची वाढती संख्या लक्षांत घेऊन पंचाय  त सदस्य व नागरिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या टास्क फोर्स समितीची तातडीची बैठक होऊन त्यांत चर्चेद्वारे अनेक ठोस निर्णय घेण्यात आले.यामध्ये आस्कावाडा येथे जो भाग सील करण्यात आला आहे.त्या भागांतील लोकांना अत्यावश्यक सामान उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवकांची फळी तयार करण्यात आली आहे.या स्वयंसेवकांचे मोबाईल क्रमांक स्थानिक पंच सदस्य प्रदीप हडफडकर याना देण्यात येणार असून त्यांच्यामार्फत संपर्क साधला जाणार आहे.
गांवांतील दुकानदार,केशकर्तनालय व अन्य व्यावसायिकांनी कोविड १९ चे सर्व नियम पळून आपापला व्यवसाय करावा तसेच प्रत्येकाने कोविडची तपासणी घ्यावी त्यासाठी पंचायत त्यांची व्यवस्था करेल.मांद्रे पंचायत क्षेत्रांतील एखाद्या नागरिकाचा अहवाल  सकारात्मक आल्यानंतर तुये आरोग्य केंद्रामार्फत मांद्रे पंचायतीला माहिती मिळेल याची व्यवस्था करण्यात येणार आहे.सकारत्मक अहवाल आल्यानंतर ती व्यक्ती घरांत विलगीकरण मागत असेल तर त्याची व्यवस्था आहे कि नाही याची चौकशी तपासणी यंत्रणा करेल. गांवांत दर दोन दिवसांनी कोविड १९ व अन्य नियमासंदर्भांत जागृती कार्नाय्त येणार आहे. गांवांतील आस्कावाडा व मधलामाज येथे कोविडची सद्यस्थिती काय आहे या संदर्भांत जनजागृती करण्यात येणार आहे.या बैठकींत तुये आरोग्य केंद्राचे गौरेश शेटगांवकर यांनी कोविडच्या मांद्रेतील सद्यस्थितीची माहिती विस्तृत केली.कोविड १९ च्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करताना,एकमेकांपासून अंतर राखणे,मासीक वापरणे,हात स्वच धुवून सॅनिटायजरचा वापर करणे.विलगीकरणात आल्यानंतर फिरण्यास मनाई आहे.आदी सर्व नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी डॉ.जोसेफ फेर्नांडीस म्हणाले कि,लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.लोकांमध्ये जागृती होणे आवश्यक असल्याचे डॉ.जोसेफ म्हणाले.यावेळी सरपंच सौ. सेरेफिना डिसोझा,उपसरपंच आंब्रोस फेर्नांडीस,ऍड.प्रसाद शहापूरकर,संगम म्हामल,शंकर गोवेकर,महेश कोनाडकर,दुमिंग फेर्नांडीस,तुषार गोवेकर आदींनी महत्वाच्या सूचना मांडल्या.प्रारंभी ऍड.प्रसाद शहापूरकर यांनी स्वागत केले व मागील बैठकांचा अहवाल सादर करून या बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.शेवटी त्यांनीच आभार मानले.दरम्यान कोविड काळांत पंचायत सदस्य व टास्क फोर्स समितीने सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला.  

संबंधित बातम्या