मुरगावात रस्त्यावरच सांडपाणी; नागरिकांमध्ये नाराजी

मुरगाव एलमाॅन्त थिएटर जवळ मलनिस्सारण घाण रस्त्यावर वाहत असल्याने वाहनचालकांना या घाणीतून वाट काढावी लागते.
Sewage on the road in Murgaon; Dissatisfaction among the citizens
Sewage on the road in Murgaon; Dissatisfaction among the citizensDainik Gomantak

मुरगाव एलमाॅन्त थिएटर जवळ मलनिस्सारण घाण रस्त्यावर वाहत असल्याने वाहनचालकांना या घाणीतून वाट काढावी लागते. संबंधितांकडून अजून उपाययोजना नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Sewage on the road in Murgaon; Dissatisfaction among the citizens
अगोदर राज्यातील ऐतिहासिक दस्‍तावेज सांभाळा : आप

गेले तीन दिवस मुरगाव एलमाॅन्त थिएटर जवळ एका सेवेरेजच्या मेनहोल मधून सांडपाणी तुडुंब भरून मुख्य रस्त्यावर कारंजाच्या स्वरूपात बाहेर येत आहे. ही सर्व घाण रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे. तसेच मुख्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शेकडो लोकांना या सांडपाण्यातून वाट काढावी लागते.

वाहन जाताना अंगावर घाण पाणी पडत असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणे जोखमीचे बनले आहे. दिवसाकाठी शेकडो वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. संबंधित अधिकार्‍यांनी त्यावर तातडीने उपाययोजना करावी,अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com