
जेटी येथे सेव्हरेज ओवर फ्लोचा सिलसिला सुरूच असून वाहन चालकाकडून तसेच स्थानिकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. मलनिस्सारण विभागाकडून काम व्यवस्थित केले नसल्याचा ठपका नागरिकांनी ठेवला.
जेटी येथील सेवेची भूमिगत लाईन ओवरफ्लो होण्याचा प्रकार गेले चार महिन्यापासून अधिकच वाढ झाली आहे. त्यामुळे याचा नाहक त्रास वाहन चालकाबरोबर येथील नागरिकांना सहन करावा लागतो. सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने जेटी भागात दुर्गंधी पसरली आहे.
तसेच वाहन चालकांच्या अंगावर खास करून दुचाकी चालकांच्या अंगावर सदर सांडपाणी पडत असल्याने वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हल्लीच एक महिन्याअगोदर सदर भूमिगत मलनिस्सारण पाईपलाईनचे काम करण्यात आले होते. यात दोघा कामगारांना आपला जीव धोक्यात घालण्याची पाळी आली होती.
नंतर सदर काम तातडीने बंद करण्यात आले होते. मात्र अजून पर्यंत पाईपलाईन ओवरफ्लो होत असल्याने संबंधितांना अजून दुरुस्तीचा भाग सापडत नाही. त्यामुळे वारंवार ओवरफ्लो होण्याचे प्रकार घडतात.
तसेच मान्सूनपूर्व गटारे अजून साफ न झाल्याने याच भागात गटारातील घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. याविषयी संबंधितांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.