गोव्यात कळंगुटच्या हॉटेलमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

गुन्हे शाखेने गुरुवारी कळंगुट येथे चालवल्या जाणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत, दोन दलालांना अटक केली.

पणजी : गुन्हे शाखेने गुरुवारी कळंगुट येथे चालवल्या जाणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत, दोन दलालांना अटक केली. यावेळी पोलिसांकडून तीन महिलांचीही सुटका करण्यात आली. त्यांची रवानगी मेरशी येथील महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. तिन्ही तरूणी मुळच्या पश्चिम बंगाल येथील आहेत. आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

गोव्यातील कुडचडे रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेचे डबे अचानक घसरले

काही लोक महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची पडताळणी करण्यासाठी एक टीम नेमण्यात आली होती. काल संध्याकाळी कळंगुट मधील व्हिलेज रॉयल हॉटेलजवळील पार्किंगमध्ये एका ग्राहकाला देण्यासाठी तरूणींना घेऊन आरोपी आले होते. त्यापूर्वीच पोलिस पथकाने साधअया वेशात येऊन रचलेल्या सापळ्यात आरोपी अडकले.

गोव्यातली पहिलीच दुर्मिळ घटना; यकृतात वाढला अडीच महिन्यांचा गर्भ

त्यांना ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत ते पश्चिम बंगालमधून तरूणींना आणून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. पर्यटक गोव्यात येऊ लागल्याने किनारपट्टी परिसर पर्यटकांनी गजबजलेला आहे. त्यामुळे त्या परिसरात अनैतिक व्यवसायही मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. मसाज पार्लरच्या पडद्यामागून वेश्या व्यवसाय सुरू आहे. 
 

संबंधित बातम्या