सेक्स स्कँडलची क्राईम ब्रँचच्या विशेष पथकामार्फत चौकशी व्हावी: आमोणकर

सेक्स स्कँडल प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचच्या (Crime Branch) विशेष तपास पथकामार्फत (एसआयडी) करून सत्य उजेडात आणण्याची मागणी त्यांनी केली.
सेक्स स्कँडलची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी; आमोणकर यांची मागणी

सेक्स स्कँडलची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी; आमोणकर यांची मागणी

Dainik Gomantak

Scandal : मुरगाव येथील सेक्स स्कँडलप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी अजूनही कोणतीच प्रक्रिया सुरू केली नाही. मात्र, या उलट पीडित महिलने दिलेल्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणाचा पर्दाफाश करणाऱ्यांनाच पोलिस (Police) बळाचा वापर करून आमदारांकडून सतावणूक केली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे (Congress) नेते संकल्प आमोणकर यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचच्या (Crime Branch) विशेष तपास पथकामार्फत (एसआयडी) करून सत्य उजेडात आणण्याची मागणी त्यांनी केली.

सेक्स स्कँडलची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी; आमोणकर यांची मागणी

गोव्यात कोरोनाचा कहर; आठवड्याभरात 4 हजारांहून अधिक लोक कोरोनाबाधित

पणजी काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला शंकर पोळजी, प्रज्योत वेंगुर्लेकर, विनी भगत व जॅक उपस्थित होते. आमोणकर म्हणाले की, या प्रकरणात गुंतलेल्या आमदाराची चौकशी करण्याऐवजी या घटनेचा पर्दाफाश करणाऱ्यांवरच दबाव आणून आपल्या मर्जीप्रमाणे जबानी नोंदवून घेण्यासाठी सतावणूक करत आहेत. महिला पोलिस स्थानकात पुराव्यासह तक्रार दिली आहे त्याची नोंद झाली नाही. त्यामुळे न्यायालयात जाणार असून या प्रकरणाची चौकशी पारदर्शक तसेच निःपक्षपातीपणे व्हावी यासाठी निर्देश देण्याची विनंती केली जाणार आहे.

सेक्स स्कँडलची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी; आमोणकर यांची मागणी

'इतर पक्षांकडून पैसे घ्या, पण मत मात्र 'आप'लाच द्या'

यावेळी संकल्प आमोणकर यांनी पीडित आणि आमदार मिलिंद नाईक (Milind Naik) यांच्यातील फोनवरील संभाषणाच्या दोन ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केल्या आहेत, ज्यात नाईक पीडितेला दरमहा पैसे देण्याचे वचन देत आहे. ते म्हणाले की पोलिस मुरगावमधील काही निवड लोकांना लक्ष्य बनवून माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व काही आमदाराच्या आशिर्वादाने सुरू आहे. मुरगाव पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक हे आमदाराच्या हातातील बाहुले बनले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

आगामी निवडणुकीत (Goa Assembly Elections) आमदार मिलिंद नाईक यांनी समोरासमोर लढा द्यावा, असे आव्हान देत आमोणकर म्हणाले की, येथील लोकांचा छळ करून माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत असाल तो शक्य नाही. गेले काही दिवस संयम ठेवून होतो. मात्र, हा प्रकार असाच सुरू राहिला तर त्यांच्याविरुद्ध आणखी जे पुरावे आहेत ते पूर्णपणे उघड केले जातील, असा इशारा त्यांनी दिला.

सेक्स स्कँडलची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी; आमोणकर यांची मागणी

ममतांचा मतदारांना अजब सल्ला; भाजपचे नेते पैसे देतायेत ते घ्या पण...

पीडितेच्या बॅंक खात्यात लाखो रुपये कुठले?

पीडित महिला आणि तिच्या दुसऱ्या पतीच्या बँक खात्यात एका माहिन्यात लाखो रुपये कसे जमा झाले आहेत त्याचाही तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणाशी काहीच संबंध नसताना मुरगाव पोलिसांनी त्याला पोलिस स्थानकावर बोलावून घेतले व तेथे पीडित महिलेने पोलिसांच्या देखत हल्ला केला तरी बघ्याची भूमिका पोलिसांनी घेतली. पोलिसांनी नाहक छळ सुरू ठेवला तरी जे सत्य आहे ते उजेडात येईपर्यंत लोकांमध्ये यासंदर्भात जागृती करणार असल्याचे आमोणकर यांनी संगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com