Goa: यंदाच्‍या पर्यटन हंगामात शॅक्‍स वाढण्याची शक्यता

गोवा सरकारने शॅक्‍स मालकांच्या भल्यासाठी 50 टक्‍के पर्यटन शुल्क माफ केले
Goa: यंदाच्‍या पर्यटन हंगामात शॅक्‍स वाढण्याची शक्यता
Shacks is likely to increase during tourist season in GoaDainik Gomantak

सासष्टी: गेल्या वर्षी पर्यटन व्यवसाय सुरू होऊन तो काही प्रमाणात बहरत असताना कोरोना विषाणूची दुसरी लाट (Covid -19) सुरू झाली. त्‍यामुळे पर्यटन (Tourism) व्यवसायावर निर्भर असलेल्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. गेल्या वर्षी 60 टक्के शॅक्‍स (Shacks) सुरू करण्यात आल्‍या होत्‍या. पण, आता कोरोना संसर्ग नियंत्रणात येऊ लागल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. यंदाच्या पर्यटन हंगामात शॅक्‍सची संख्‍या निश्चितच वाढणार आहे, अशी माहिती गोवा शॅकमालक (Goa Shack Owners) कल्याण सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी दिली.

Shacks is likely to increase during tourist season in Goa
पावाच्या किंमतीवरून बेकर्स संघटनांमध्ये मतभेद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या शॅक मालकांच्या भल्यासाठी गोवा सरकारने 50 टक्‍के पर्यटन शुल्क माफ केले आहे. पर्यटन शुल्कावर संपूर्ण सूट किंवा किमान 75 टक्के सूट देण्याची तसेच गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (GEL) शुल्क सरकारने माफ करावे, अशी मागणी शॅक मालकांनी सरकार दरबारी केली होती. ‘जीईएल’ शुल्क माफ करण्यासाठी आता मुख्यमंत्री तसेच पर्यटन मंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे, असे क्रुझ कार्दोज यांनी सांगितले. पर्यटन शुल्क भरण्यासाठी जी मुदत दिली आहे त्यातही वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.