वैद्यकीय शिक्षण घेतानाही 'ती' देतेय मूर्तींना रंग!

तुकाराम सावंत
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे येत आहेत. त्याचेच एक जागते उदाहरण म्हणजे डिचोलीतील मणेरकर यांच्या पारंपरिक चित्रशाळेत पाहायला मिळत आहे. वैद्यकीय शिक्षण घेणारी रिध्दी उदय मणेरकर ही युवती सध्या गणपतीच्या मूर्तींना रंगकाम करताना आढळून येत आहे. गणेश चतुर्थी जवळ आली असून, आता सर्वत्र चतुर्थीची लगबग सुरु झाली आहे.

डिचोली

आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे येत आहेत. त्याचेच एक जागते उदाहरण म्हणजे डिचोलीतील मणेरकर यांच्या पारंपरिक चित्रशाळेत पाहायला मिळत आहे. वैद्यकीय शिक्षण घेणारी रिध्दी उदय मणेरकर ही युवती सध्या गणपतीच्या मूर्तींना रंगकाम करताना आढळून येत आहे. गणेश चतुर्थी जवळ आली असून, आता सर्वत्र चतुर्थीची लगबग सुरु झाली आहे.
चित्रशाळांमधून मूर्तिकार आता रात्री जागवून विघ्नहर्त्या गणरायाच्या मूर्तींना रंग देण्याच्या कामात व्यग्र असल्याचे आढळून येत आहेत. कोरोना महामारीमुळे यंदा राज्याबाहेरील कारागीरही उपलब्ध झाले नसल्याने काही चित्रशाळांमधून युवती आणि गृहिणींचे हातही कामाला लागले आहेत. शहरातील उदय मणेरकर यांच्या चित्रशाळेतही सध्या मूर्तींना रंग देण्याचे काम जोरात सुरू आहे. या चित्रशाळेत गेल्यावर एक वेगळाच अनुभव मिळतो. आणि तो म्हणजे उदय याच्याबरोबर चक्‍क वैद्यकीय शिक्षण घेत असलेली त्यांची मुलगी गणपतीच्या मूर्तींना रंग देऊन आपल्या वडिलांना मदत करत असल्याचे दिसून येत आहे. या कामात रिध्दी पारंगत झाली आहे. रंगकामाचे कोणतेही प्रशिक्षण नसताना आवड आणि त्यामागील जिद्‌दीच्या बळावर रिध्दी एखाद्या कसलेल्या कुशल कलाकारांप्रमाणे गणपतीच्या मूर्तींना सहज रंग देते. विशेष म्हणजे रिध्दी ही गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दंतचिकीत्सा हा वैद्यकीय अभ्यासक्रम शिकत आहे. सध्या ती तृतीय वर्षात आहे. शिक्षणाचा अहंकार न बाळगता ऑनलाईन शिक्षण घेतानाच वेळात वेळ काढून रिध्दी गणपतीच्या मूर्तींना रंग देताना आढळून येत आहे. वर्षापूर्वी लग्न झालेली उदय यांची वकील असलेली ज्येष्ठ कन्या धनदा याही फावल्या वेळेत चित्रशाळेत येऊन वडिलांना मदत करीत असते. आपल्या मुलींना लहानपणापासूनच गणपतीच्या मूर्तींना रंग देण्याची आवड. फावल्या वेळेत त्या चित्रशाळेत मूर्तींना आवडीने रंग देण्याचे काम करतात. आता त्या रंगकामात परिपक्‍व ‌‌‌‌‌‌‌‌‌झाल्या आहेत. आता त्यांना मूर्तींना कोणता आणि कसा रंग द्यावा. हे सांगण्याची गरज पडत नाही. असे सांगतानाच आपल्या मुलींबद्‌दल आपल्याला सार्थ अभिमान वाटत आहे. असे उदय मणेरकर यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या