यंदा भारतातून हज यात्रेला कुणी जाणार नाही; शेख जिना यांच्याकडून खुलासा

Sheikh JinnahSheikh Jinnah
Sheikh JinnahSheikh Jinnah

मडगाव: कोविडच्या वाढत्या प्रकोपामुळे सौदी सरकारने बाहेरच्या देशातून हज यात्रेसाठी येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातल्याने यावेळीही भारतातून हज यात्रेला कुणी भाविक जाऊ शकणार नाही अशी माहिती अखिल भारतीय हज समितीचे अध्यक्ष शेख जिना यांनी सांगितले.(Sheikh Jinnah said No one will go on Hajj from India in this year )

यावेळी भारतातून हज यात्रेला जाण्यासाठी एक लाखांच्या वर भाविकांचे अर्ज आले होते. सुरवातीला भारताला 5 भाविकच या यात्रेला पाठविण्याची परवानगी मिळाली होती. पण केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यानी हा कोटा  10 हजार पर्यंत वाढवून आणला होता. मात्र आता सौदी सरकारने विदेशी यात्रेकरुवर बंदी घातल्याने यावेळीही भारतीय भाविकांना हजची यात्रा चुकणार आहे. 2020 मध्येही कोविडमुळे सौदी सरकारने ही यात्रा रद्द केली होती. 2022 साली ही यात्रा होऊ शकते मात्र त्यासाठी भाविकांनी कोविड लस टोचून घेऊन सज्ज राहावे असे आवाहन त्यांनी केले.

संसर्गाचा वेग...
 कोरोना आढळल्यापासून या विषाणूच्या स्ट्रेनमध्ये खूप बदल होत गेले. यातील ‘डेल्टा प्लस’ हा अलीकडेचा स्ट्रेन असून, तो संक्रमित आहे. याशिवाय आतापर्यंतच्या सर्व स्ट्रेनपेक्षा तो वेगाने वाढतो. त्यामुळे लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याने नागरिकांनी दोन्ही डोस घ्यावेत, शिवाय मास्क व कोरोना मार्गदर्शक तत्त्वे पाळावीत, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

दरम्यान डेल्टा स्ट्रेन संसर्ग झालेले रुग्ण गोव्यात व देशात  मोठ्या प्रमाणात बरे झाले आहेत. डेल्टा प्लस स्ट्रेनचा संसर्ग गोव्यात झाला नसल्याचे आरोग्य खात्याकडून सांगण्यात येत असले तरी तो आढळून आल्यास त्याचे घातक परिणाम येत्या काळात दिसून येऊ शकतात.

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना संसर्गाची शक्यता ही 30 टक्के होते. मात्र दोन्ही डोस घेतल्यानंतर सुरक्षिततेचे प्रमाण हे 80 टक्क्यांवर येते. दोन्ही डोस घेतल्यानंतर मृत्यूचा धोकाही कमी होतो. कोमॉर्बिड असणाऱ्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यायला हवी, असे नव्या डेल्टा स्ट्रेनवरून लक्षात आल्याची माहिती ऑक्सफर्ड लॅबचे डॉ. नानासाहेब थोरात यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

1 लाख 64 हजार बाधित
गोव्यात मार्च 2020 पासून कोरोना महामारीचा संसर्ग सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 1 लाख 64 हजार 957 लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 1 लाख 59 हजार 29 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच कोरोना बाधित बरे होण्याचे प्रमाण 9641 आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com