गोवा निवडणूकीचे बिगूल वाजल्याने IIT आंदोलनाला स्थगिती

निवडणूक झाल्यानंतर परत मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा
गोवा निवडणूकीचे बिगूल वाजल्याने IIT आंदोलनाला स्थगिती
Goa IIT Update: शेळ मेळावली येथील सातेरी देवस्थानात आज पत्रकार परिषदेत बोलताना शंकर नाईक व मेळावली ग्रामबचाव आंदोलन समितीचे समन्वयक शशिकांत सावर्डेकर व इतर पदाधिकारीDainik Gomantak

गुळेली: शेळमेळावली येथील आय आय टी आंदोलकांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक जाहीर झाल्यामुळे आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले. यावेळी बोलताना मेळावली ग्रामबचाव आंदोलन समितीचे समन्वयक शशिकांत सावर्डेकर म्हणाले की काल निवडणूक आयोगाने गोव्यात निवडणूक तारीख जाहीर केली त्यामुळे आज पासून कोड लागल्याकारणाने आम्ही आमचे आंदोलन निवडणूक होई पर्यंत स्थगित करत आहेत.(Goa IIT Update Shel Melauli IIT agitation postponed due to announcement of Goa elections)

Goa IIT Update: शेळ मेळावली येथील सातेरी देवस्थानात आज पत्रकार परिषदेत बोलताना शंकर नाईक  व  मेळावली ग्रामबचाव आंदोलन समितीचे समन्वयक शशिकांत सावर्डेकर व इतर पदाधिकारी
Goa Election: प्रसाद गावकर देणार आज आमदारकीचा राजीनामा

निवडणूक (Goa Assembly Election) संपन्न झाल्यानंतर परत मोठ्या ताकदीनिशी आम्ही हे आंदोलन पुढे नेणार आहेत आमच्या वर घातलेले खटले,त्याच बरोबर आमच्या जमीनींचा प्रश्न हे सरकारने (Goa Government) सोडवले नाही पुढचे सरकार कुणाचेही येवो आम्ही आमचे आंदोलन चालू ठेवणार आहे.

या समितीचे पदाधिकारी शंकर नाईक म्हणाले की 19 डिसेंबर पासून आम्ही आंदोलन सुरू केले आहे सरकारने आमच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करतो.भाजपा (BJP) सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार नाही त्यांना सर्वसामान्य जनतेचे काहीच पडून गेलेले नाही.आमच्या मागण्या जो पर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवणार आहे सध्या फक्त निवडूकीमुळे स्थिगत करत आहोत. यावेळी इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com