शेट्येवाडा-म्हापसा विकासासाठी कटिबद्ध : संतोष कोरगावकर

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

आमदार या नात्याने शेट्येवाडा-म्हापसा येथील अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे आपण आतापर्यंत पूर्णत्वास नेण्यासाठी योगदान दिलेले आहे, असे नमूद करून या प्रभागात भाजपपुरस्कृत उमेदवार संतोष कोरगावकर निश्चितपणे विजयी होईल, असा दावा हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांनी केला आहे.

म्हापसा : आमदार या नात्याने शेट्येवाडा-म्हापसा येथील अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे आपण आतापर्यंत पूर्णत्वास नेण्यासाठी योगदान दिलेले आहे, असे नमूद करून या प्रभागात भाजपपुरस्कृत उमेदवार संतोष कोरगावकर निश्चितपणे विजयी होईल, असा दावा हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांनी केला आहे. म्हापसा पालिका निवडणुकीतील प्रभाग सातमधील अर्थांत शेट्येवाडा भागातील भाजपपुरस्कृत ‘म्हापसा विकास आघाडी’चे अधिकृत उमेदवार संतोष कोरगावकर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी तेथील माजी नगरसेवक फ्रँकी कार्वाल्हो व माजी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा उपस्थित होते. 

गोवा: NDA तून का बाहेर पडलो? कारण सांगताना सरदेसाईंचे भाजपवर गंभीर आरोप

नगरसेवक या नात्याने आपण केलेल्या कामाची पोचपावती या वेळी लोक भाजपला देतील, असा विश्वास उत्तर गोवा भाजपचे उपाध्यक्ष फ्रँकी कार्वाल्हो यांनी व्यक्त केला. प्रभागाच्या राखीवतेमुळे आपण यंदा पालिका निवडणूक लढवू शकलो नसतो तरी आपण पाठिंबा दिलेले उमेदवार संतोष कोरगावकर प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतील, असेही ते म्हणाले. आपण सर्वांशी सलोख्याचे नाते प्रस्थापित करून शेट्येवाडा प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.

संबंधित बातम्या