Goa Shigmotsav: शिगमोत्सवामुळे नवोदित कलाकारांना मिळते व्यासपीठ

कलेला प्रोत्साहन : लोककला, लोकसंस्कृती जीवंत ठेवणारा उपक्रम
Goa Shigmotsav 2023
Goa Shigmotsav 2023Dainik Gomantak

गोव्याला लोककला, लोकसंस्कृती, लोकजीवनाचा समृद्ध वारसा लाभला आहे. येथील सण, उत्सव, प्रथा, परंपरा आपले वेगळेपण आजही अबाधितपणे राखून आहेत. येथील लोकसंस्कृती आजही ग्रामीण भागात जीवंत आहे.

मात्र, तिचे अस्तित्व टिकविणे गरजेचे आहे. शासकीय पातळीवर जो शिगमोत्सव विविध शहरांमध्ये होतो, त्यामुळे नवोदित कलाकारांना व्यासपीठ लाभते.

शिवाय शिगमोत्सवामुळे लोकसंस्कृती युवा पिढीपर्यंत पोहोचते. लोककलाकाराला सन्मान प्राप्त होतो, त्याला व्यासपीठ प्राप्त होते. एका शिगमोत्सव मिरवणुकीत लोकनृत्य, रोमटामेळ, चित्ररथ आदी कलाप्रकारांमध्ये भाग घेणारे सुमारे 5 हजारांहून जास्त कलाकार असतात.

त्यामुळे त्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन मिळते. हेच कलाकार भविष्यात राज्याचे नाव उज्ज्वल करतात. त्यामुळे शिगमोत्सव जास्तीत जास्त ठिकाणी व्हावा, अशी कलाकारांची अपेक्षा आहे.

पुरेसे मानधन हवे!

शिगमोत्सवात सहभागी होणाऱ्या कलाकारांची संख्या मोठी असते. रोमटामेळ, लोकनृत्य प्रकारांमध्ये 200 हून अधिक कलाकार सहभागी होतात. अशावेळी सरकारकडून जे मानधन देण्यात येते, ते पुरेसे नाही.

कारण कोणतीही कला सादर करताना त्यासाठी लागणारा पेहराव व इतर साहित्य बरेच महागले आहे. त्यामुळे मानधनात काही प्रमाणात वाढ होणे गरजेचे आहे, अशी भावना लोककलाकार व्यक्त करतात.

Goa Shigmotsav 2023
Ponda News: ललितप्रभेची संगीत स्पर्धा उत्साहात

डिचोली, सत्तरी आणि इतर काही भागांमध्ये पौर्णिमेनंतर पारंपरिक शिगमोत्सव होत असल्याने शासकीय शिगमोत्सवात सहभागी होण्यास अडचण निर्माण होते. शिगमोत्सवात जी लोकनृत्ये सादर केली जातात, ती प्रामुख्याने विधिनाट्य आहेत. त्यामुळे पारंपरिकता भंग न होता कलाकारांनी मिरवणुकीत ती सादर करणे गरजेचे आहे.

- प्रभाकर माजिक, प्रमुख घाडवंश, लोकमांड, केरी-सत्तरी.

Goa Shigmotsav 2023
Margaon Rotary Club: मडगाव रोटरी क्लबचा ‘उमंग’ महोत्सव सुरू

शिगमोत्सव मिरवणुकीमध्ये मला कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यासाठी माझे कुटुंबीय मला मदत करतात. यंदा ‘कांतारा’ या गाजलेल्या चित्रपटातील पंजुलिकाची भूमिका मी साकारली होती.

- मयुरी मयेकर, बाल कलाकार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com