Shigmo 2021: गोवा सरकारने शिगमोत्सव रद्द केल्याने गोमंतकीय नाराज
Shigmo 2021 Gomantakiya upset over Goa government cancellation of Shigmotsav

Shigmo 2021: गोवा सरकारने शिगमोत्सव रद्द केल्याने गोमंतकीय नाराज

पणजी: शासकीय पातळीवरील शिगमोत्सव सरकारने रद्द केल्याने सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कॅसिनोवर खुले आम मौज मजा चालू आहे, तिथली गर्दी सरकारला चालते, मिरामार व इतर समुद्र किनाऱ्यावर पर्यटक सगळी बंधने झुगारून गर्दीने जीवाचा गोवा करताहेत, ते चालते, मग गोमंतकीय सर्व बंधने पाळून अशा उत्सवातून आनंद घेतात त्यांना वंचित का केले जात आहे, असा प्रश्न लोक करत आहेत.

पणजी शिगमोत्सव समिती, म्हापसा शिगमोत्सव समिती यांनी तर सगळी तयारी केली होती. करमणुकीचे कार्यक्रम ठरवून टाकले होते. मुख्य शहरातील शिगमोत्सव होणार, असे संकेत सरकारी पातळीवरून मिळाल्याने पणजी शिगमोत्सव समितीने कोल्हापूरवरून रंगमंच वगैरे मागवून सेट उभारण्याचे काम चालू केले होते. एकूण इतरही तयारीही पूर्ण केली होती.

कांपाल पणजी येथे हुनर हाट प्रदर्शन भरविले गेले आहे, तिथे विविध प्रकारचे तीनशे स्टॉल असून हजारो लोक तिथे भेट देत आहेत. समुद्र किनाऱ्यावर प्रचंड गर्दी होत आहे. मास्क न लावताच सगळीकडे पर्यटकांचा वावर आहे. तरीसुद्धा हे प्रकार सुरू आहेत. शिगमोत्सवच सर्व नियम पाळून होणार होता, परंतु  यंदा शिमगोत्सवच रद्द करण्याचा निर्णय  सरकारने घेतला आहे, तो अन्यायकारक आहे, अशी भावना अनेकांची बनली आहे.

पणजी शिगमोत्सव समितीने आझाद मैदानावर होणारा रंगपंचमीचा कार्यक्रम अगोदरच न करण्याचा निर्णय घेतला होता.समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की आझाद मैदानावरील ठरलेले करमणुकीचे कार्यक्रम करायला तरी सरकारने परवानगी देणेगरजेचेहोते कारण या कार्यक्रमांना येणारे लोक सामाजिक अंतर पाळून कार्यक्रमांचा आस्वाद घेतील, याची तजवीज केली होती आणि मुख्य म्हणजे या कार्यक्रमांना ‘हुनर हाटर’ला गर्दी होत आहे. त्या तुलनेत 25 टक्के पण नसेल. मग आमच्या संपूर्ण तयारी केलेल्या कार्यक्रमांवर सरकार कोविडचे कारण देवून गदा आणून काय साधत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com