
Goa Shigmotsav 2023 : पर्वरीत यंदा पहिल्यांदाच शिगमोत्सव साजरा केला जाणार आहे. रविवार दि. 12 मार्च रोजी तेथे ‘घुमचे कटर घूम’चा नाद ऐकायला मिळणार आहे. पर्वरी शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून स्थानिक आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची निवड करण्यात आली आहे. साळगावचे आमदार केदार नाईक यांना उपाध्यक्षपद दिले आहे.
पर्वरी सर्व्हिस रस्त्यावर प्रशिक्षण संस्था ते आझाद भवन यादरम्यान शिगमोत्सव मिरवणूक दुपारी 3.30 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती पर्वरी शिगमोत्सव समितीचे खजिनदार अनुज हरमलकर यांनी दिली.
पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पेन्ह द फ्रान्सचे सरपंच स्वप्निल चोडणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
रोमटामेळसाठी प्रथम पारितोषिक 35 हजार
चित्ररथ मिरवणुकीसाठी प्रथम 45 हजार रुपये, द्वितीय 30 हजार, तृतीय 25 हजार, चतुर्थ 20 हजार तर पंचम बक्षीस 15 हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकी 5 हजार रुपयांची 13 उत्तेजनार्थ बक्षिसे असतील.
रोमटामेळ मिरवणुकीसाठी अनुक्रमे रु. ३५ हजार, रु. २० हजार, रु. 15 हजार, रु. 10 हजार व रु. 7 हजार तर प्रत्येकी 4 हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
लोकनृत्य स्पर्धेसाठी अनुक्रमे रु. 17 हजार, रु. 12 हजार 500, रु. 10 हजार, रु. 8 हजार, रु. 5 हजार आणि 4 हजार रुपयांची 10 उत्तेजनार्थ बक्षिसे
वेशभूषा स्पर्धेसाठी पहिले 4 हजार, दुसरे 3 हजार, तिसरे 2 हजार रुपये
लहान मुलांच्या वेशभूषेसाठी प्रथम 2 हजार, दुसरे 1 हजार आणि तिसरे 500 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.