गोव्यात सरकारी पातळीवर शिगमोत्सव साजरा केला जाणार नाही

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मार्च 2021

गोव्यात सरकारी पातळीवर शिगमोत्सव साजरा केला जाणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत केली.

पणजी: गोव्यात सरकारी पातळीवर शिगमोत्सव साजरा केला जाणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत केली. ते म्हणाले राज्यात कोविडचे रूग्ण वाढत आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.

महिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांचा राजीनामा; आपमध्ये करणार प्रवेश 

शिगमोत्सव पूर्वतयारी केलेली चित्ररथ पथके व रोमटामेळ पथके यांना सरकारकडून भरपाई दिली जाणार आहे. यंदा पणजी, मडगाव व फोंडा या शहरांत सरकारकडून शिगमोत्सवाचे आयोजन केले जाणार होते.

Holi 2021 Guidelines: तुमच्या राज्यातील होळीसाठी कोरोना मार्गदर्शक सूचना जाणून घ्या 

सरकारने शिगमोत्सव आयोजन थांबवले असले तरी गावागावात धार्मिक पद्धतीने होणारे शिगमोत्सव साजरे होतील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले संबंधित आयोजकांनी धार्मिक उत्सवावेळी मोठी गर्दी होणार नाही आणि सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होईल याची दक्षता घेतली पाहिजे.

गोव्यातील संजीवनी साखर कारखाना प्रकरणावरून सभागृहात गदारोळ

संबंधित बातम्या