Shigmotsava Festival 2021: गोव्यातील या तीन शहरात साजरा होणार शिमगोत्सव

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 मार्च 2021

गोव्यातील राज्य सरकारने यंदाच्या शिग्मोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र इतर वेळेप्रमाणे या वेळी हा उत्सव पणजी, म्हापसा आणि फोंडापुरताच मर्यादित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पणजी: गोव्यातील राज्य सरकारने यंदाच्या शिग्मोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र इतर वेळेप्रमाणे या वेळी हा उत्सव पणजी, म्हापसा आणि फोंडापुरताच मर्यादित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पणजी आणि म्हापसा मधील परेड 3 आणि 4 एप्रिल रोजी होणार, अशी माहिती देणयात आली आहे, तर फोंड्यातील कार्यक्रमाची तारीख अद्याप ठरलेली नाही. 

गोवा राज्याच्या पर्यटनमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार पुन्हा एकदा हा महोत्सव फोंड्यापासून सुरू होईल, पण त्यासाठीची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
शिंमगोत्सव आणि कार्निवल (जे मागील महिन्याच्या शेवटी झाले होते) हे दोन्ही सण गोवा  प्रमुख सण आहेत. हे सण बर्‍याच पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करतात. या उत्सवात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटक भाग घेताना दिसतात.

पिलियन रायडर्स बनताहेत वाटाड्या; गोव्याच्या वाहतूक पोलिसांची वाढलीये डोकेदुखी 

कोविडच्या वाढत्या परिणामांचा विचार करता यंदाचे सण या तीन शहरांमध्ये होणार आहे. लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन पर्यावरण मंत्र्यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या वेळी मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टंन्स ठेवणे सक्तिचे असणार आहे.
शिग्मोत्सव हा वसंतोत्सव आहे आणि हा गोवा राज्यातील एक प्रमुख उत्सव आहे.

गोवा शिमगोत्सव राज्यभर सादर करण्याची कलाकारांची मागणी 

संबंधित बातम्या