शिवसेनेचे संजय राऊत आज म्हापशात

कॅसिनोविरोधात प्रचार करून भाजपने गोव्‍यात सत्ता बळकावली आहे.
शिवसेनेचे संजय राऊत आज म्हापशात
शिवसेना नेते संजय राऊतDainik Gomantak

म्हापसा: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena Leader Sanjay Raut) हे आज गुरुवार दुपारी साडे तीन वाजता म्हापसा (Mapusa) येथील श्री बोडगेश्वर देवस्थानाला भेट देऊन देवदर्शन घेतील. त्यानंतर ते म्हापसा व शिवोली (Siolim) भागातील पक्षकार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत, अशी माहिती पक्षाचे राज्यप्रमुख जितेश कामत (Jitesh Kamat) यांनी दिली.

गोव्यात सध्या राजकारणाचे (Goa Politics) जोरदार वारे वहायला लागले आहे. त्यातच विविध राष्ट्रीय नेत्यांच आगमन गोव्यात होत आहे. पक्षांतर म्हणा किंवा पक्ष बांधणीचं काम म्हणा वेगाने सुरू झाले आहे. त्यातच काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गोव्यात आगमन केले.

शिवसेना नेते संजय राऊत
Goa राज्यातील शाळा दिवाळीपूर्वीच होतील सुरू...

कॅसिनोविरोधात प्रचार करून भाजपने गोव्‍यात सत्ता बळकावली आहे. आता जनतेनेच या सरकारला धडा शिकवायला हवा. विधानसभा निवडणुकीत शिवसेना गोव्‍यात 22 जागा लढवेल आणि सत्ताही स्थापन करेल, असा विश्‍‍वास शिवसेनेचे खासदार व गोवा प्रभारी संजय राऊत यांनी व्‍यक्त केला.

दाबोळी विमानतळावर काल बुधवारी दुपारी राऊत यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना प्रमुख जितेश कामत, उपप्रमुख सुभाष केरकर, सरचिटणीस मिलिंद गावस, कुठ्ठाळीतील महिला आघाडीच्या नेत्‍या व शिवसेना प्रमुख भक्ती खडपकर, रिया पाटील आणि शिवसैनिक मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.

शिवसेना नेते संजय राऊत
Goa Politics: राज्यात नवीन राजकीय 'सर्कस' उलगडतेय...

दरम्‍यान, राऊत हे दोन दिवसांच्‍या गोवा दौऱ्यावर आले आहेत. आपल्‍या दौऱ्यात ते शिवसेनेच्‍या नेत्यांशी चर्चा करून राजकीय स्थितीचा आढावा घेतील. तसेच पेडणे व मांद्रे येथील शिवसेना कार्यालयांचे उद्घाटन करतील.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com