Ganesh Chaturthi 2023: चतुर्थी बाजारावर पावसाचे सावट; विक्रेते चिंतेत

विघ्‍नहर्त्या गणरायाला साकडे; खरेदीला अजून नाही जोर
Ganesh Chaturthi | Matoli Market in Banastari Goa
Ganesh Chaturthi | Matoli Market in Banastari Goa

Ganesh Chaturthi 2023 Bajar: गोमंतकीयांचा सर्वांत मोठा सण गणेश चतुर्थी अवघ्‍या चार दिवसांवर आला आहे. त्‍यानिमित्त सर्वत्र उत्साह संचारला आहे. मात्र डिचोलीत खरेदीसाठी अद्याप उत्साह दिसून येत नाही. चतुर्थी जवळ आली तरी अपेक्षेप्रमाणे खरेदीला जोर आलेला नाही.

पुढील दोन दिवसांत खरेदीला वेग येणार असल्याचा विश्‍‍वास दुकानदारांनी व्‍यक्त केला आहे. दरम्‍यान, दुसऱ्या बाजूने चतुर्थी बाजारावर पावसाचे सावट असल्याने दुकानदार चिंतेत सापडले आहेत.

गेल्यावर्षी ऐन चतुर्थीच्‍या बाजारावेळी पावसाने कहर केला होता. यंदाही बाजारावर पावसाचे सावट आहे. गुरुवारी सकाळी काहीवेळ पावसाची बरसातही झाली.

Ganesh Chaturthi | Matoli Market in Banastari Goa
Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघात प्रकरणातील संशयित मेघनाचा वाहन परवाना अखेर रद्द

सायंकाळी हवामान ढगाळ होते. त्यामुळे दुकानदार आणि विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत आहे. विघ्नहर्त्या गणरायाची कृपादृष्टी होऊन चतुर्थीचा बाजार सुरळीत होवो, अशी प्रार्थना दुकानदार आणि गणेशभक्त करीत आहेत.

डिचोली बाजार चतुर्थीनिमित्त आकर्षक सजावटीच्या साहित्याने फुलला आहे. मिठाई, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह रेडिमेड कपड्यांची दुकाने सजली आहेत. लाकडी साहित्यही बाजारात उपलब्ध झालेले आहे.

काल आठवडी बाजारापासून खरेदीला वेग येईल अशी अपेक्षा होती. मात्र म्‍हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आजही (गुरुवारी) बाजारात खरेदी संथगतीने सुरू होती. त्यामुळे दुकानदारांची निराशा झाली.

येत्‍या शनिवारनंतर बाजारात खरेदीला वेग येणार असल्याचा विश्‍‍वास दुकानदार आणि विक्रेत्यांना आहे. चतुर्थी जवळ आली तरी बाजारात अपेक्षेप्रमाणे गर्दी दिसून येत नाही, असे रेडिमेड कपडे विक्रेते अजित परब यांनी सांगितले.

रविवारपासून भरणार माटोळीचा बाजार

येत्या रविवारपासून डिचोलीत माटोळीचा बाजार भरणार आहे. बाजारातील पारंपरिक जागेतच हा बाजार भरणार असून, पालिकेने बँक ऑफ इंडियासमोर गणपतीपूजन मंडपाजवळ पारंपरिक जागा आरक्षित केली आहे.

माटोळीच्या बाजारापासून डिचोलीत गणेशभक्तांची खरेदीला गर्दी होणार असल्याचा विश्‍‍वास दुकानदार आणि विक्रेत्यांना वाटत आहे.

Ganesh Chaturthi | Matoli Market in Banastari Goa
Goa Ganesh Chaturthi 2023: चवथीचा बाजार आता स्विगीवर! घरातूनच मागवा मोदक, लाडू, नेवरी अन् खूप काही...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com