पणजी पालिका मार्केट व्यापारी संघटनांना विश्‍वासात न घेता ७ जानेवारीपर्यंत दुकाने बंद

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 5 जानेवारी 2021

पालिका दुरुस्ती अध्यादेशसंदर्भात राज्यातील विविध शहरातील पालिका मार्केट व्यापारी संघटनांना विश्‍वासात न घेता ७ जानेवारीला दुकाने बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय मागे  घेतला

पणजी: पालिका दुरुस्ती अध्यादेशसंदर्भात राज्यातील विविध शहरातील पालिका मार्केट व्यापारी संघटनांना विश्‍वासात न घेता ७ जानेवारीला दुकाने बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय मागे घेण्याचा सध्या सक्रीय नसलेल्या अखिल गोवा व्यापारी महासंघाने घेतला तो मान्य नाही.

त्यांनी निर्माण केलेल्या या संभ्रमामुळे नियोजित दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मागे न घेता तो पुढे ढकलण्यात आला आहे. येत्या दोन - तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी अखिल गोवा व्यापारी संघटनांच्या संयुक्त मंचची स्थापना करण्यात आली असून त्यामार्फत चर्चा करून पुढील निर्णय ठरवण्यात येणार आहे. पालिका दुरुस्ती अध्यादेश रद्द करण्याची सर्व पालिका मार्केट व्यापारी संघटनांची मागणी आहे.

या संघटनांच्या संयुक्त मंचच्या शिष्टमंडळाशी समस्यांवर चर्चा करून सरकारने नव्याने दुरुस्ती अध्यादेश काढण्याची मागणी करणार आहे. ही चर्चा सफल न झाल्यास राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्यासाठीची हाक देताना किमान तीन दिवसांची मुदत दिली जाईल अशी माहिती संघटनांच्या मंचचे निमंत्रक आशिश शिरोडकर यांनी पणजीतील बैठकीनंतर बोलताना दिली.

आणखी वाचा:

 सत्तरीतील आयआयटी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध कायम -

संबंधित बातम्या