म्हापसा पालिकेला विक्रेत्यांचा अल्प प्रतिसाद

नगरसेवकांच्या सूचना: ‘टाउन वेंडिंग कमिटी’ सदस्यत्वासाठी अकरापैकी केवळ पाच अर्ज
म्हापसा पालिकेला विक्रेत्यांचा अल्प प्रतिसाद
Mapusa MunicipalityDainik Gomantak

म्हापसा: म्हापसा पालिकेच्या ‘टाउन वेंडिंग कमिटी’ सदस्यपदासाठी अर्ज सादर करण्याची सूचना पालिकेने वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली होती. तसेच त्यासंदर्भात संबंधितांशी पत्रव्यवहार करूनही त्यास विक्रेत्यांकडून अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला आहे. नियमानुसार या समितीवर पुरेसे सदस्य असावेत यासाठी जनसंपर्क करण्याचा निर्णय म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी सीताराम सावळ यांच्या अध्यक्षतेखाली या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस म्हापसा पीपल्स युनियनतर्फे सुदेश तिवरेकर, म्हापसा मासळी विक्रेता संघटनेतर्फे शशिकला गोवेकर तसेच गणेशपुरी रहिवासी संघटना, फुले विक्रेता इत्यादी संघटनांचे व वाहतूक पोलिसांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र म्हापसा, पोलिस स्थानक, उपजिल्हाधिकारी कार्यालय व आरोग्य खाते यांचे प्रतिनिधी उनुपस्थित होते. तसेच, आशीर्वाद खोर्जुवेकर, विराज फडके, साईनाथ राऊळ या तीन नगरसेवकांनी बैठकीत सहभागी होऊन विविध सूचना केल्या.

Mapusa Municipality
सोनसोडोत साठवलेला कचरा बाहेर काढण्याचे काम सुरू

या समितीवर अकरा विविध प्रकारच्या विक्रेत्यांची निवड करायची आहे. परंतु, त्यासंदर्भात केवळ पाचच संघटनांचे अर्ज पालिकेसमोर आले आहेत. बाजारपेठ परिसरातील विक्रेते, मातीकामाच्या वस्तूंच्या बाजारातील विक्रेते, भाजीविक्रेते इत्यादींच्या प्रतिनिधींनी अद्याप समितीच्या सदस्यत्वासाठी अर्ज केले नाहीत. त्यामुळे, त्यांच्याशी पालिकेच्या वतीने संपर्क साधण्यात यावा, असे या बैठकीत ठरले.

म्हापसा पालिकेच्या शहर विक्रेता समितीची बैठक बुधवार 11 रोजी सकाळी पालिका संकुलात झाली. त्या बैठकीत टाउन वेंडिंग कमिटीवरील सदस्यांची निवड करण्यात येणार होती. तथापि, अपुऱ्या संख्येने अर्ज आल्याने ती प्रक्रिया खोळंबली.

‘अर्बन स्ट्रीट वेंडर्स, 2009 ’च्या राष्ट्रीय धोरणाच्‍या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि त्यानंतरच्या स्ट्रीट वेंडर्स (प्रोटेक्शन ऑफ लाइव्हलीहूड ॲण्ड रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट वेंडिंग) कायदा 2014 /(2014 चा केंद्रीय कायदा) आणि गोवा स्ट्रीट वेंडर्स (प्रोटेक्शन ऑफ लायव्हलीहूड ॲण्ड रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट वेंडिंग) नियम 2016 अनुसार या समितीवर नगरपालिका आयुक्त किंवा मुख्याधिकारी हे या समितीचे अध्यक्ष, तर नागरी सामाजिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी या समितीचा सदस्य-सचिव असतो.

या समितीवर स्थानिक अधिकारिणीचे तीन सदस्य, जिल्हाधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी, नियोजन आणि विकास प्राधिकरणाचा अध्यक्ष किंवा त्यांचा प्रतिनिधी, वाहतूक पोलिस प्रमुख आणि सर्वसाधारण पोलिस किंवा त्यांचा प्रतिनिधी, स्ट्रीट वेंडर्स असोसिएशनचे अकरा प्रतिनिधी (त्यापैकी किमान एक-तृतीयांश महिला सदस्य, मार्केट आणि ट्रेड असोसिएशनचा प्रत्येकी एक प्रतिनिधी, बिगर शासकीय संघटनांचे/ एनजीओंचे दोन प्रतिनिधी आणि सामाजिक संघटनेचा/ ‘सीबीओ’चा एक सदस्य, शहरातील राष्ट्रीयीकृत लीड बँकेचा एक प्रतिनिधी यांचा समावेश असतो.

Mapusa Municipality
हळर्णचा पंपहाऊस हरवला झुडपात!

अर्जाच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद

म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी सीताराम सावळ यांनी स्ट्रीट वेंडर्स असोसिएशन, मार्केट अँड ट्रेड असोसिएशन, एनजीओ/सीबीओ, रेसिडेंशिअल वेल्फेअर असोसिएशन, शहरातील राष्ट्रीयीकृत प्रमुख बँक यांच्याकडून अर्ज मागवले होते. या टाउन वेंडिक कमिटीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असून ते अर्ज 4 फेब्रुवारीपर्यंत करावेत असे आवाहन करण्यात आले होते. परंतु, त्याबाबत सदस्यत्वपदासाठी पुरेसे अर्ज येऊ शकले नाहीत. अकरापैकी केवळ पाच गटांचे अर्ज पालिकेसमोर सादर झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.