जिवाचा गोवा करायला आलेल्या पर्यटकाला स्थानिकांनी दिला बेदम चोप

कळंगुटात थरार! गोव्यात पर्यटकाने झाडल्या वेटरवर गोळ्या...!
जिवाचा गोवा करायला आलेल्या पर्यटकाला स्थानिकांनी दिला बेदम चोप
Shots fired at waiter by tourist in GoaDainik Gomantak

शिवोली: जिवाचा गोवा (Goa) करायला आलेल्या एका पर्यटकाने (Tourist) कळंगुट (Calangute) येथे क्षुल्लक कारणावरून वेटरवर देशी बंदुकीने गोळ्या (Firing) झाडल्याची घटना घडली असून या घटनेने कळंगुट परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने बंदुकीचा नेम चुकल्याने या दुर्घटनेतून वेटर बचावला, परंतु या घटनेने खवळलेल्या स्थानिकांनी मात्र या घटनेशी संबंधित दोघा पर्यटकांना बेदम चोप दिला.

गावरावाडा - कळंगुट येथील एका छोटेखानी रेस्टॉरंटमध्ये आज संध्याकाळी उशीरा ही घटना घडली. हरियाणा येथील सुशीलकुमार भगवान व आणखी एक असे दोघे देशी पर्यटक या हॉटेलमध्ये आले असता तेथील वेटरशी त्यांची प्रथम बाचाबाची झाली. त्यानंतर सुशीलकुमार भगवान या पर्यटकाने चक्क देशी बंदुकीने वेटरवर गोळ्या झाडल्या.

Shots fired at waiter by tourist in Goa
Goa: गुरांच्या हल्ल्यात हॉटेलमालक जखमी

या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी या पर्यटकास ताब्यात घेतले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक लोकांनी पोलिसांच्या ताब्यातील संशयित सुशीलकुमार याला जबर मारहाण केल्याने त्याला कांदोळीतील आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. तेथे उपचारानंतर त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गावरावाडा येथील खासगी हॉटेलमध्ये हरियाणातील दोघे पर्यटक आले होते. त्यांची हॉटेलच्या वेटरशी क्षुल्लक कारणामुळे बाचाबाची झाली. यावेळी त्यापैकी एका पर्यटकाने आपल्याकडील देशी बंदुकीने वेटरवर गोळ्या झाडल्या. सुदैवाने बंदुकीचा निशाणा चुकल्याने संबंधित हॉटेलचा वेटर बचावला, परंतु या प्रकारामुळे परिसरात जमा झालेल्या स्थानिक तसेच जवळच्या आराडी नामक वस्तीतील परप्रांतीय लोकांनी पोलिसांच्या ताब्यातील त्या पर्यटकांना बराच मार दिल्यामुळे दोघांपैकी एका तरुणास पोलिसांना उपचारासाठी स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करावे लागले. दरम्यानच्या काळात गोंधळाचा फायदा घेत या घटनेत सहभागी दुसरा पर्यटक घटनास्थळांवरून पसार झाला. स्थानिक पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Shots fired at waiter by tourist in Goa
Goa: गोव्यात बिगर गोमंतकीयांचा धंदा तेजीत

कळंगुट येथे आज कुणावरही बंदुकीने हल्ला झाला नाही. तथापि, हल्लाप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील देशी बनावटीची बंदुक जप्त केली आहे.

- नोलास्को रापोझ, पोलिस निरीक्षक

राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. राज्यपालांनी गोव्यातील लोकांना सुरक्षा पुरविण्यास अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला बरखास्त करावे अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने दोन दिवसांमागे केली होती. आज कळंगुट येथे गावठी पिस्तुल व गोळ्या सापडण्याची घटना समोर आली आहे.

- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com