चार शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

Dainik Gomantak
बुधवार, 27 मे 2020

ही चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे.

पणजी

सध्या राज्यात सुरू असलेल्या गोवा शालान्‍त मंडळाच्या दहावीच्या इंग्रजी प्रश्‍नपत्रिकेत मित्रांचा संवाद या मथळ्याखाली एका प्रश्‍नावरून झालेल्या गोंधळाप्रकरणी सरकारने चार शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे गोवा शालान्‍त मंडळाचे धाबे दणाणले असून ही चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे.
गेल्या शनिवारी (२३ मे) दहावीची इंग्रजी विषयाची परीक्षा होती. या प्रश्‍नपत्रिकेतील एका प्रश्‍नावरून राज्यातील बेरोजगारीसंदर्भात व भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडला गेल्याने त्याविरोधात टीका सुरू झाली होती. या टीकेला राज्य सरकारला सामोरे जावे लागले आहे. भ्रष्टाचार व नोकऱ्या मिळवणे, कसे कठीण आहे, याचा संदर्भ प्रश्‍नातील मित्रांचा संवादमध्ये उल्लेख होता. ही प्रश्‍नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे ही इंग्रजी विषयाची प्रश्‍नपत्रिका ज्या शिक्षकांनी तयार केली होती त्यांना यासंदर्भात जाब विचारणारी कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या