वास्कोमधील १४ दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस

Show cause notice to 14 shops in Vasco
Show cause notice to 14 shops in Vasco

मुरगाव :  वास्को येथील मुरगाव पालिकेच्या जुन्या भाजी मार्केट इमारतीत बेकायदेशीररित्या इमारतीच्या भिंती पाडून विविध प्रकारच्या दुकानांना रोलिंग शटर्स बसविल्याची दखल घेऊन मुरगाव पालिकेने १४ दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. याविषयी मुख्याधिकारी अरविंद बुगडे यांनी दुकानदारांना नोटीस बजावण्याचे आदेश तांत्रिक विभागाला दिले आहे.

वास्कोत स्वातंत्रपथ आणि देशपांडे मार्ग या मधोमध सुमारे पन्नास मीटर लांबीची मुरगाव पालिकेची जुनी भाजी मार्केट इमारत आहे. या इमारतीत भाजी आणि किराणा दुकाने होती.परंतू गेल्या काही दिवसांपासून ही दुकाने बंद करून मोबाईल, सेनेटरी, आणि अन्य गृहपयोगी वस्तूंची दुकाने सुरू केली आहेत. या शिवाय या इमारतीत मटका जुगाराचे अड्डेही सुरू करण्यात आले आहेत.

मोबाईल दुकान धारकांनी इमारतीच्या भिंती पाडून रोलिंग शटर्स बसविले आहे. हा प्रकार बेकायदेशीर आहे याची दखल घेऊन नीज गोंयकार संघटनेचे नेते चंद्रशेखर वस्त यांनी मुरगाव पालिकेकडे तक्रार केली. जुन्या भाजी मार्केट इमारतीत परवान्याविना दुकाने उभारली आहेत. शिवाय भिंती पाडून रोलिंग शटर्स दुकानांना घातले आहे यावर पालिकेने कारवाई करावी तसेच याप्रकरणी मार्केट निरीक्षकाची चौकशी करावी, अशी मागणी श्री. वस्त यांनी केली होती. याची दखल घेऊन पालिकेने १४ दुकानांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, वास्कोत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे दुकानांचे विस्तारीकरण करणे आणि त्यानंतर रोलिंग शटर्स घालणे अशा प्रकारांना ऊत आला आहे. पालिका मार्केट परीसरातील बहुतेक सर्वच दुकानांना रोलिंग शटर्स बसविली आहे. याला पालिकेची मान्यता नसल्याचे एकूण चौकशीत आढळून आले आहे. पालिकेच्या मार्केट निरीक्षक आणि नगरसेवकांना हाताशी धरून हा प्रकार चालल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

चौकशीच्या मागणीनंतर निर्णय...
आज (गुरुवारी) सकाळी श्री. वस्त यांनी मुख्याधिकारी अरविंद बुगडे यांची वास्कोतील पत्रकारांच्या समवेत भेट घेऊन जुन्या भाजी मार्केट मधील बेकायदेशीर दुकानांच्या बाबतीत पालिकेने कोणता निर्णय घेतला आहे, अशी विचारणा केली असता १४ दुकानांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे असे श्री.वस्त यांना सांगून नोटीस जारी करण्याचे आदेश तांत्रिक विभागाला दिले. त्यानुसार तांत्रिक विभागाचे अभियंते श्री.मिस्किता यांनी संबंधित दुकान मालकांना नोटीस बजावली जाईल असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com