बोगस पदवीप्रकरणी उपभापतींच्या  मुलाला कारणेदाखवा नोटीस 

dainik gomantak
मंगळवार, 2 जून 2020

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून पदासाठी निवड झालेल्या १६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती मात्र या यादीतून निवड झालेल्या रेमंड फिलीप फर्नांडिस याचे नाव वगळण्यात आले होते.

पणजी,

उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून पदासाठी उपसभापतीचे पुत्र रेमंड फिलीप फर्नांडिस याने अर्ज करताना बोगस पदवी सादर केल्याचे चौकशीत उघड झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीत याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा का दाखल केला जाऊ नये यासंदर्भात तीन दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. या नोटिशीमुळे रेमंड फर्नांडिस हे अडचणीत आले आहेत. 
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून पदासाठी निवड झालेल्या १६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती मात्र या यादीतून निवड झालेल्या रेमंड फिलीप फर्नांडिस याचे नाव वगळण्यात आले होते. त्यामुळे १५ उमेदवारांनाच नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. या यादीतील इतर उमेदवारांना सेवेत रुजू होण्याचे पत्र पाठवण्यात आले होते. त्याचे नाव यादीतून वगळण्यात आल्याने निवड होऊनही त्याला नोकरीला मुकावे लागले आहे. त्याने केलेल्या या बनवेगिरीच्या गुन्ह्यामुळे तो अडचणीत सापडला आहे. त्याचे वडील उपसभापती असल्याने या प्रकरणाबाबत ते काय हालचाली करतात याकडेही तक्रारदाराचे लक्ष आहे. 
अव्वल कारकून या पदासाठी रेमंड फिलीप फर्नांडिस याची पदवी बोगस असल्याची तक्रार ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी केली होती. याची दखल घेऊन त्याच्या शैक्षणिक पदवीची चौकशी करण्यात आली. ज्या विद्यापीठाकडून ही पदवी त्याने घेतली होती, त्याला मान्यताच नसल्याचे गोवा विद्यापीठाने केल्‍याचे तपासणीत आढळून आले होते व तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला होता. उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचा रेमंड फर्नांडिस हा मुलगा असल्याने त्याला झुकपे माप देऊन निवड झाली असावी. या पदवीची तपासणी ज्या अधिकाऱ्यांनी केली होती, त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्याची विनंती रॉड्रिग्ज यांनी केली आहे. 
गोवा विद्यापीठाने रेमंड फर्नांडिस याने ज्या विद्यापीठामधून पदवी परीक्षा उत्तीर्णचे प्रमाणपत्र मिळवले होते त्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने बोगस विद्यापीठांची तयार केलेल्या यादीमध्ये नाव होते. त्यामुळे या विद्यापीठाची पदवी ग्राह्य धरता येत नाही. त्याने जी पदवी सादर केली होती ती लखनऊ येथील भारतीय शिक्षा परिषद या विद्यापीठाची होती. मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यात हे विद्यापीठ बोगस असल्याचे नमूद केले होते. त्याची प्रतही गोवा विद्यापीठाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली होती. या चौकशीचा अहवाल त्यानंतर मुख्य सचिवांना पाठविल्यानंतर रेमंड फर्नांडिस हा या पदासाठी पात्र ठरत नसल्याने त्याचे नाव अव्वल कारकून यादीतून रद्द करण्यात आले होते. 
 

संबंधित बातम्या