गोवा वेल्हा परिसरात श्रावणी शनिवार साजरा

किशोर नाईक
सोमवार, 27 जुलै 2020

श्रावण मासात्तील नागपंचमी व पहिला शनिवार २५ जुलै रोजी या भागांत ठिकठिकाणी साजरा झाला. सुवासिनीनी या दोन्ही सणांचे व्रत पाळले.
 

गोवा वेल्हा

श्रावण मासात्तील नागपंचमी व पहिला शनिवार २५ जुलै रोजी या भागांत ठिकठिकाणी साजरा झाला. सुवासिनीनी या दोन्ही सणांचे व्रत पाळले.
श्रावण मासात आलेल्या नागपंचमी निमित्त स्थानिक सुहासीनीनी आज सकाळपासूनच या नागपंचमीच्या पूजेसाठी आपल्या ग्रामाजवळ असलेल्या नाग मंदिरात मुर्तीचे मनोभावे पूजन केले. काहींनी आपल्या घरीच नाग पूजून त्याची पूजा केली. यावेळी त्याच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेक, हार, फुले, बेल-पत्री अर्पण केली. यासाठी खास व्रत पाळले. मंदिर व्यवस्थापन कोविडचा धोका ओळखून साध्या पद्धतीने नाग पंचमीचा सण पाळला. नेवरा, डोंगरी, बांबोली सैनिकी पठार, शिरदोन आदि भागांचा यात प्रमुखांने समावेश होता. नाग पंचमीबरोबर श्रावणातला पहिला शनिवारही या भागांत पाळण्यात आला. या दिवशी प्रामुख्याने सुवासिनी शनिवारचे व्रत पाळतात. त्यांनी आज सकाळी आपल्या घरी शनिदेवाची पूजा केली. याभागातील मंदिरातही पुरोहितांच्या हस्ते श्रींची पूजा करतांना कोविड 19 साठी घातलेले नियम पाळण्यात आले.

संपादन ः संजय घुग्रेटकर

 

संबंधित बातम्या