श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण मंदिरात सात दिवसांचा गणेशोत्सव

प्रतिनिधा
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

कुंभारजुवे खाडीतील सांगडोत्सव रद्द, विसर्जनासाठी छोटा सांगोड

खांडोळा: वार्षिक कुंभारजुवेच्या मांडवी नदी पात्रात शेकडो वर्षांपासून साजरा होणारा सांगोडोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे वार्षिक सांगोड स्पर्धाही होणार नाही. परंतु श्री शांतादुर्गा मंदिरात सात दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून काल श्री गणेशमूर्तीचे  विधीवत पूजन करण्यात आले.
इतर विधी, कार्यक्रम सामाजिक अंतराने साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शेट यांनी सांगितले.

श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण ही देवी कुंभारजुवे गावातील सर्व ग्रामस्थ तसेच हिंदू रहिवासी जनतेची ग्रामदेवता असल्याने भाविक तिला प्रेमाने ‘देवते पाव गे’ म्हणून हाक मारतात. 

श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण मंदिरातील श्रींच्या सात दिवशीय उत्सवात विविध चित्रांसहित होड्यावर होणारा पारंपरिक ‘‘सांगडोत्सव’’ यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळ रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे विविध पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक विषयावरील देखावे यंदा पाहायला मिळणार नाहीत. तसेच यंदा देवळातील श्रींची मूर्ती पालखीतून विसर्जनासाठी नेली जाणार नाही. परंतु  श्रींची मूर्ती पूजारी डोक्यावर घेऊन विसर्जनासाठी माशेल-तारीवाडापर्यंत घेऊन जाणार आहेत. तेथे  मंदिरातील श्रींच्या विसर्जनासाठी छोटासा सांगड बांधण्यात येणार आहे. त्यात श्रींच्या मूर्तिसह, भटजी काटकर, जल्मी, अध्यक्ष व सांगाड वल्हवणारे, एवढीच मंडळी असतील. पारंपरिकरित्या श्रींच्या सात फेऱ्या मारल्यानंतर श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.
 

संबंधित बातम्या