परमेश्‍वरकृपा, डॉक्‍टरांच्‍या प्रयत्‍नांमुळे वाचलो - श्रीपाद नाईक

UNI
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

परमेश्‍वराचे आशीर्वाद, डॉक्टरांचे अथक प्रयत्न व लोकांच्या शुभेच्छा, यामुळे आपण भीषण अपघातातून वाचलो. मात्र, आपली पत्‍नी व सहकारी गमावल्‍याची खंत केंद्रीय आयुष व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्‍यक्‍त केली. भीषण अपघातानंतर पहिल्यांदाच केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पणजी - परमेश्‍वराचे आशीर्वाद, डॉक्टरांचे अथक प्रयत्न व लोकांच्या शुभेच्छा, यामुळे आपण भीषण अपघातातून वाचलो. मात्र, आपली पत्‍नी व सहकारी गमावल्‍याची खंत केंद्रीय आयुष व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्‍यक्‍त केली. भीषण अपघातानंतर पहिल्यांदाच केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

ज्यावेळी अपघात झाला व त्यानंतर आपली स्थिती पाहता खरोखरच अद्‍भूत किमया झाल्याचा प्रत्‍यय आपल्‍याला आला. परमेश्‍वराची कृपा झाली, लोकांच्या शुभेच्छा व ज्येष्ठांचे आशीर्वाद फळाला आले, असे सांगताना श्रीपाद नाईक यांचा स्वर हळवा झाला. कारण, अपघातात श्री. नाईक यांच्या पत्नी विजया यांचा मृत्‍यू झाला, याची आठवण झाल्‍यावर ते भावूक झाले. 

इस्‍पितळातून कामकाज सुरू!
‘एम्स’चे वैद्यकीय पथक, तसेच गोमेकॉतील डॉक्टरांनी रात्रंदिवस निगराणी ठेवून आपल्यावर उपचार केले, त्याला तोड नाही. आपल्यावरील उपचारात कुठलीही कमतरता राहू नये, यासाठी डॉक्टरांनी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस जागरण केले. दर मिनिटांनी आपल्यावर लक्ष दिले जात होते. त्याबद्दल गोवा वैद्यकिय महाविद्यालयातील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी यांचा आपण शतश: आभारी आहे. तब्येत सुधारल्यानंतर आपण इस्पितळातूनच खात्याचा कारभार सुरू केला. फाईल्‍स हाताळल्या, असे सांगून ३ मार्चपासून सुरू होणाऱ्या लोकसभा अधिवेशनाला आपण उपस्थिती लावणार असल्‍याचीही इच्छा त्‍यांनी व्‍यक्त केली.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या