तरुण पिढीमध्ये विश्र्वासाचा धागा रुजवावा: केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक

केंद्र व राज्य सरकार आपल्यापरीने देशाच्या प्रगतीसाठी सर्वप्रकारे प्रयत्न करीत असल्याचे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Union Minister of State Shripad Naik) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
Union Minister of State Shripad Naik
Union Minister of State Shripad NaikDainik Gomantak

फातोर्डा: एकमेंकावर विश्र्वास ठेवला तर पुष्कळ चांगल्या गोष्टी होऊ शकतात. सद्याच्या युगात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जेणेकरुन शंकेची पाल प्रत्येकाच्या मनात चुकचुकू लागली आहे. अविश्र्वासाचा धागा जो पर्यंत संपत नाही तो पर्यंत देशाची उन्नती होणार नाही. विश्र्वासाचा धागा तरुण पिढीमध्ये रुजविणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र व राज्य सरकार आपल्यापरीने देशाच्या प्रगतीसाठी सर्वप्रकारे प्रयत्न करीत असल्याचे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. दलित सेवा संघटनेने डॉ. बी. आर. आंबेडकर (Dr. B. R. Ambedkar) यांच्या 130व्या जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या आपल्या 23व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर (Babu Kavalekar) तसेच माजी शिक्षक, समाज सेवक किसन फडते, डॉ. चंद्रकांत गावकर यांच्यासह इतर 15 मान्यवरांचा दलित सखा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

Union Minister of State Shripad Naik
थायलंड बंद असल्याने राहुल गांधी गोव्यात सुट्टीवर: तेजस्वी सूर्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी आपल्या ज्ञानाच्या बळावर देश, युवा पिढी, संस्कृती, राष्ट्रभक्ती कशी असावी याची शिकवण दिली. त्यांच्यासह इतर स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यानंतर देश उन्नती करेल याची स्वप्ने पाहिली व त्या दृष्टिने प्रयत्नही सुरु केले. स्वातंत्र्यानंतर संस्काराची परंपरा कायम ठेवली असती तर देशाची समृद्धी आणखीन वाढली असती. पण स्वार्थी स्वभावामुळे त्यागाची भावना नष्ट होत गेली. पूर्वजानी दिलेला वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कमी पडलो असेही केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, राज्यसभा खासदार विनय असेही केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, किसन फडते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रवीन्द्र भवनचे अध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यानी स्वागत केले. प्रो. गुणाजी देसाई यानी सत्कारमुर्तींची ओळख करुन दिली. या प्रसंगी संघटनेने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे भेटवली तर गरजवंत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच भेट देण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com